महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
अमित शहांनी मुख्यमंत्रिपदबाबत पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, तिन्ह पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. यासंदर्भात कोणताही वाद-विवाद नाही. पहिल्या दिवसापासून हे ठरलं आहे की, निकालानंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन हे ठरवतील. त्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो आम्हाला सर्वाना मान्य असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आता खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंच्या सेनेला लोकांनी स्वीकारलं आहे. जेव्हा वारंवार एका व्यक्तीला किंवा पक्षाला टार्गेट करता तेव्हा त्याच्यातील तीव्रता कमी होते. लोकांना काही दिवसांनी त्यांचं सत्य समजतं. जनतेनमध्येसहानूभुती तयार होते, तसंच मविआने आम्हाला टार्गेट केलं पण लोकांनी आमचे ट्रॅक रेकॉर्ड पाहून मतदान केल्याचं फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राच्या जनतेपुढे आमचे साष्टांग दंडवत आहे. विषारी प्रचाराला जनतेने कृतीतून उत्तर दिलं होतं. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, चक्रव्यूव्ह तोडून दाखवू आणि ते चक्रव्यूव्ह तोडून टाकलं आहे. लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षात निवडून आलेल्या लोकांचा आम्ही सन्मान करू, त्यांचा आवाज छोटा असू की मोठा आवाज असू ते ज्या योग्य गोष्टी असतील त्यावर त्यांनी आम्ही योग्य प्रतिसाद देऊ, असंही फडणवीसांनी सांगितलं.