धनंजय मुंडेंची आघाडी कायम, अतुल सावे पिछाडीवर, मराठवाड्यात महायुतीच्या उमेदवारांचा बोलबाला

  • 04:47 PM, Nov 23 2024

    Jintur Vidhan Sabha: भाजपच्या मेघना बोर्डीकर सलग दुसऱ्यांदा विजयी

    भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. शरद पवार गटाचे विजय भांबळे यांना 4 हजार 577 मतांनी पराभवाची धूळ चारली आहे.

  • 03:34 PM, Nov 23 2024

    Ashok Chavan: लेकीच्या विजयावर खासदार अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, मविआच्या नेत्यांना धरले धारेवर

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. 21व्या फेरीपर्यंत श्रीजया या 41 हजार 241 मतांनी आघाडीवर आहे. शेवटच्या काही फेऱ्या शिल्लक राहिल्या आहेत. दरम्यान कार्यकर्त्यांकडून अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी जल्लोष करण्यात आला. कन्येच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांनी भोकर ऐवजी राज्यात लक्ष दिलं असतं तर चांगला फायदा झाला असता, असा टोला चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे.

  • 03:27 PM, Nov 23 2024

    धीरज देशमुख यांचा पराभव

    लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांचा पराभव झालाय.

  • 03:09 PM, Nov 23 2024

    बबनराव लोणीकर विजयी

    परतूर मंठामधून बबनराव लोणीकर विजयी झाले आहेत.

  • 03:08 PM, Nov 23 2024

    केजमधून 3000 मतांनी नमिता मुंदडा विजयी

    केजमधून 3000 मतांनी नमिता मुंदडा विजयी झाल्या आहेत. भाजपच्या नमिता मुंदडा यांचा केज मधून विजय. पृथ्वीराज साठे यांचा पराभव

  • 03:06 PM, Nov 23 2024

    बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर विजयी

    बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर विजयी झाली आहेत. 5000 पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी

  • 03:02 PM, Nov 23 2024

    Sandeep Kshirsagar: बीड विधानसभा मतदारसंघातून 28 व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर 5 हजार 559 मतांनी आघाडीवर

  • 02:47 PM, Nov 23 2024

    Kailas Patil: २४ व्या फेरीअखेर मविआचे उमेदवार कैलास पाटील हे 24 हजार 547 मतांनी आघाडीवर

  • 02:42 PM, Nov 23 2024

    Assembly Election Result 2024 Live : रत्नाकर गुट्टे विजयी

    गंगाखेडमध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे हे विजयी झाले आहेत.

  • 02:39 PM, Nov 23 2024

    Hingoli Vidhan Sabha: हिंगोलीचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची विजयाची हॅट्रिक

  • 02:35 PM, Nov 23 2024

    Aashti Vidhan Sabha: आष्टी मतदारसंघातील भाजपच्या सुरेश धस यांची विजयाकडे वाटचाल

    आष्टी मतदारसंघातील भाजपच्या सुरेश धस यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. सुरेश धस यांना 60 हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे.

  • 02:10 PM, Nov 23 2024

    श्रीजया चव्हाण विजयी

    अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण विजयी झाल्या आहेत.

  • 02:01 PM, Nov 23 2024

    Tanaji Sawant: भूम परांडा मतदारसंघात तानाजी सावंतांची आघाडी कायम

  • 01:16 PM, Nov 23 2024

    Tuljapur Vidhan Sabha: तेराव्या फेरीअखेर भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील १७ हजार २७७ मतांनी आघाडीवर

  • 01:08 PM, Nov 23 2024

    Tanaji Sawant: दहाव्या फेरीअखेर शिवसेनेच्या तानाजी सावंतांना केवळ 557 मतांची आघाडी

  • 01:04 PM, Nov 23 2024

    Imtiyaz Jalil: औरंगाबाद पूर्व मतदारसंघात इम्तियाज जलील यांची आघाडी कायम

  • 12:59 PM, Nov 23 2024

    Sanjay Shirsat: औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात 17 व्या फेरीअखेर संजय शिरसाट ११ हजार ४५१ मतांनी आघाडीवर

  • 12:57 PM, Nov 23 2024

    Bhokar Vidhan Sabha: भोकर मतदारसंघात भाजपच्या श्रीजया चव्हाण यांना मोठी आघाडी

    भोकर मतदारसंघात भाजपच्या श्रीजया चव्हाण यांना 26 हजार 891 मतांची आघाडी मिळाली आहे.

  • 12:32 PM, Nov 23 2024

    श्रीजया चव्हाणची आघाडी कायम

    भोकर विधानसभेची 13 वी फेरी झाली असून श्रीजया चव्हाण या 22000 मताची आघाडी कायम आहे.

  • 12:25 PM, Nov 23 2024

    भाजपाचे राणा जगजीतसिंह पाटील बाराव्या फेरी अखेर 15130 मतांनी आघाडीवर

    काँग्रेसचे धीरज पाटील पिछाडीवर. तुळजापूर मध्ये जल्लोषाला सुरुवात ,राणा जगजीत सिंह पाटील विजयाच्या उंबरठ्यावर

  • 12:23 PM, Nov 23 2024

    Paranda Vidhan Sabha: परांडा मतदारसंघात राहुल मोटेंची आघाडी घटली

    परांडा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत रंगली आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यंदा आमनेसामने आहेत. मतमोजणीच्या सातव्या फेरी अखेर राहुल मोटे केवळ 130 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 12:18 PM, Nov 23 2024

    Dhananjay Munde: दणदणीत विजयानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

    परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंचा दणदणीत विजय झाला आहे. यावर मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भगिनी पंकजा मुंडे यांच्यामुळे हे यश मिळाले आहे. जात, पात, धर्म यावर लोकसभेची निवडणूक झाली, परंतु या निवडणुकीत ते चालले नाही. ही ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे. मी पहिल्या दिवशी सांगितले होते, महायुतीला निर्णायक विजय मिळेल. परळी मतदारसंघात माझ्या पराभवासाठी मोठी ताकद लावण्यात आली होती, परंतु अशी ताकद लावल्यावर परळीतील जनता काय करते हे दाखवून दिले आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

  • 12:12 PM, Nov 23 2024

    Dhananjay Munde: परळीत धनंजय मुंडेंचा मोठा विजय, दादांचे शिलेदार ठरले जायंट किलर

    परळीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धनंजय मुंडेंचा मोठा विजय झाला आहे. दादांचे शिलेदार शिलेदार शरद पवारांच्या शिलेदारावर भारी पडले आहेत. धनंजय मुंडेंनी तब्बल ३० हजार ५९५ मतांची आघाडील घेतली आहे.

  • 12:01 PM, Nov 23 2024

    Dhananjay Munde; परळी मतदारसंघात 13 व्या फेरीअखेर धनंजय मुंडेंना तब्बल 77 हजार 924 मतांची आघाडी, विजय निश्चित

  • 11:50 AM, Nov 23 2024

    Pathri Vidhan Sabha: पाथरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे राजेश विटेकर 3 हजार 813 मतांनी आघाडीवर

  • 11:49 AM, Nov 23 2024

    लातूर ग्रामीणमधून रमेश कराड आघाडीवर

    लातूर ग्रामीण मतदार संघ आठवी फेरी रमेश कराड भाजपा 2100 मतांनी आघाडीवर आहेत. धीरज देशमुख काँग्रेस पिछाडीवर आहेत.

  • 11:48 AM, Nov 23 2024

    Beed Vidhan Sabha: बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांची तेराव्या फेरीअखेर 9 हजार 239 मतांनी आघाडीवर

  • 11:44 AM, Nov 23 2024

    Ausa Vidhan Sabha: भाजपचे अभिमन्यू पवार 11 हजार 17 मतांनी आघाडीवर

    औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवारांना 51 हजार 617 मते मिळाली आहेत. तर ठाकरे गटाचे दिनकर मानेंना 40 हजार 600 मतं मिळाली आहेत. अभिमन्यू पवार 11 हजार 17 मतांनी आघाडीवर आहेत.
  • 11:41 AM, Nov 23 2024

    Kalamb Vidhan Sabha: कळंब मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील 6 हजार 995 मतांनी आघाडीवर

  • 11:39 AM, Nov 23 2024

    Tuljapu Vidhan Sabha: नवव्या फेरीअखेर भाजपचे राणाजगजीत सिंह पाटील १२ हजार ४४९ मतांनी आघाडीवर

  • 11:38 AM, Nov 23 2024

    संदीप क्षीरसागर आघाडीवर

    बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांची तेरावी फेरी अखेर 9239 मतांची लीड

  • 11:30 AM, Nov 23 2024

    जलील 50 हजार मतांनी आघाडीवर

    अतुल सावे यांना मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. जलील हे 50 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

  • 11:15 AM, Nov 23 2024

    Beed Maalgaon Vidhan Sabha : बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघात दहाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे मोहन जगताप 5 हजार 740 मतांनी आघाडीवर

  • 10:56 AM, Nov 23 2024

    Gangakhed Vidhan Sabha : गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विशाल कदम आघाडीवर

    गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरी अखेर रासपचे रत्नाकर गुट्टे यांना 38 हजार 167 मते मिळाली आहेत. तर ठाकरे गट विशाल कदम यांना 38 हजार 929 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 10:52 AM, Nov 23 2024

    Kailas Patil: कळंब मतदारसंघात आठव्या फेरीअखेर कैलास पाटील आघाडीवर

    कळंब विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील आघाडीवर आहेत. कैलास पाटील यांच्या पारड्यात 32 हजार 251 मते पडली आहेत. तर महायुतीचे उमेदवार अजित पिंगळेंना 27 हजार 693 मते मिळाली आहेत

  • 10:47 AM, Nov 23 2024

    Tuljapur Vidhan Sabha: तुळजापूर मतदारसंघात सातव्या फेरीअखेर राणाजगजीत सिंह पाटील आघाडीवर

    तुळजापूर मतदारसंघात सातव्या फेरीअखेर भाजपचे राणाजगजीत सिंह पाटील ८ हजार २५७ मतांनी आघाडीवर आहेत.

  • 10:43 AM, Nov 23 2024

    Beed Vidhan Sabha: बीड विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर

    बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर आठव्या फेरी अखेर 4 हजार 60 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 10:37 AM, Nov 23 2024

    Partur Vidhan Sabha: परतुर विधानसभेत महायुती उमेदवार आघाडीवर

    परतुरचे विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर भाजपा उमेदवार बबनराव लोणीकर 821 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 10:28 AM, Nov 23 2024

    Tuljapur Vidhan Sabha: तुळजापूर मतदारसंघात सातव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पाटील आघाडीवर

    धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघात सातव्या फेरीअखेर भाजपचे राणा जगजीत सिंह पाटील ८२५७ मतांनी आघाडीवर आहेत.

  • 10:26 AM, Nov 23 2024

    Kailas Patil Kalamb Vidhan Sabha: कळंब धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर

    कळंब धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील सहावी फेरीअखेर 24 हजार 82 मतांनी आघाडीवर आहेत

  • 10:22 AM, Nov 23 2024

    Rana Patil: तुळजापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार राणा पाटील 6 हजार 935 मतांनी आघाडीवर

    तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार राणा पाटील 6 हजार 935 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 09:56 AM, Nov 23 2024

    मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का

    अतुल सावे यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. ते चाैथ्य़ा क्रमांकावर गेले असून जलील आघाडीवर आहेत.

  • 09:54 AM, Nov 23 2024

    धनंजय मुंडे 15 हजार मतांनी आघाडीवर

    धनंजय मुंडे हे 15 हजार मतांनी आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 09:52 AM, Nov 23 2024

    महायुतीच्या उमेदवारांचा बोलबाल

    मराठवाड्यामध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. बहुतेक उमेदवार आघाडीवर दिसत आहेत.

  • 09:44 AM, Nov 23 2024

    Marathwada Vidhan Sabha Election Results 2024: धीरज देशमुख पिछाडीवर

    लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख पिछाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 09:42 AM, Nov 23 2024

    संभाजीनगरमधून जलील आघाडीवर

    संभाजीनगरमधून जलील 24 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

  • 09:28 AM, Nov 23 2024

    भाजपाचे किसन वानखेडे आघाडीवर

    उमरखेडमध्ये भाजपाचे किसन वानखेडे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 09:17 AM, Nov 23 2024

    गंगाखेडमध्ये विशाल कदम आघाडीवर

    गंगाखेड विधानसभा मतदार संघात कदम विशाल विजयकुमार शिवसेना (उबाठा) ५२६४ , डॉ.रत्नाकर गुट्टे हे ३९८७ मतांनी पिछाडीवर आहेत. विशाल कदम (शिवसेना उबाठा) आघाडी:- १७७७

  • 09:14 AM, Nov 23 2024

    Jalna Vidhansabha Election Live: अर्जुन खोतकर, राजेश टोपे, संतोष दानवे, बबनराव लोणीकर आघाडीवर

    जालन्यातून अर्जुन खोतकर, घनसावंगीतून राजेश टोपे, भोकरदनमधून संतोष दानवे, परतुरमधून बबनराव लोणीकर हे आघाडीवर आहेत.

  • 09:08 AM, Nov 23 2024

    Marathwada Assembly Election Result Live : विजयसिंह पंडित आघाडीवर

    बीडचा गेवराई विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर 2288 मतांनी विजयसिंह पंडित आघाडीवर आहेत.

  • 09:07 AM, Nov 23 2024

    सुरेश धस 3700 मतांनी आघाडीवर

    बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर 3700 मतांनी सुरेश धस आघाडीवर आहेत.

  • 09:00 AM, Nov 23 2024

    संतोष बांगर पहिल्या फेरीमध्ये 2711 मतांनी आघाडीवर

    हिंगोलीच्या कळमनुरीतून संतोष बांगर पहिल्या फेरीमध्ये 2711 मतांनी आघाडीवर आहेत.
  • 08:54 AM, Nov 23 2024

    भाजपाच्या मेघना बोर्डीकर बिछाडीवर

    मेघना बोर्डीकर, भाजप 3481, विजय भांबळे, शरद पवार गट,3924 भांबळे 443 ची लीड

  • 08:50 AM, Nov 23 2024

    परभणीमधून आनंद भरोसे आघाडीवर

    परभणीमधबन आनंद भरोसे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. शिंदे गटाकडून ही निवडणूक आनंद भरोसे यांनी ही निवडणूक लढवली होती.

  • 08:45 AM, Nov 23 2024

    2024 Marathwada Assembly Election Result Live Updates: बीडमधून संदीप क्षीरसागर आघाडीवर

    बीडमधून संदीप क्षीरसागर हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 08:44 AM, Nov 23 2024

    गेवराई मतदार संघातून विजयसिंह पंडित आघाडीवर

    बीड गेवराईच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा होत्या. गेवराई मतदार संघातून विजयसिंह पंडित आघाडीवर आहेत.

  • 08:41 AM, Nov 23 2024

    भोकरदन मतदारसंघातून भाजपचे संतोष दानवे आघाडीवर

    मतदारसंघ राजेश टोपे राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीवर. परतूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर आघाडीवर. जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर शिंदे गट आघाडीवर

  • 08:40 AM, Nov 23 2024

    संभाजीनगरमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात, औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे आघाडीवर

    संभाजीनगरमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात. औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे आघाडीवर. औरंगाबाद पश्चिममधून शिंदेसेना संजय शिरसाट आघाडीवर. औरंगाबादमधून शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर. सिल्लोडमधून शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब आघाडीवर. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे रमेश बोरनारे आघाडीवर. पैठण विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे विलास भुमरे आघाडीवर. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या अनुराधा चव्हाण आघाडीवर. कन्नड विधानसभा मतदारसंघातून उदयसिंग राजपूत आघाडीवर

  • 08:38 AM, Nov 23 2024

    शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कोहळीकर आघाडीवर

    हदगाव मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कोहळीकर आघाडीवर आहेत.

  • 08:37 AM, Nov 23 2024

    Marathwada Assembly Election Results : नमिता मुंदडा आघाडीवर

    केजमधून नमिता मुंदडा या आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 08:34 AM, Nov 23 2024

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आघाडीवर

    माजलगाव पोस्टल मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आघाडीवर आहेत

  • 08:33 AM, Nov 23 2024

    तानाजी सावंत, धनंजय मुंडे, विलास भुमरे आणि संतोष दानवे आघाडीवर

    मराठवाड्यात चुरसीची लढत बघायला मिळतंय. तानाजी सावंत, धनंजय मुंडे, विलास भुमरे आणि संतोष दानवे आघाडीवर आहेत.

  • 08:28 AM, Nov 23 2024

    Beed Election Results 2024 LIVE: परळीत पोस्टल मतमोजणीत धनंजय मुंडे आघाडीवर

    बीडमध्ये पोस्टल मतमोजणीला योगेश क्षीरसागर आघाडीवर. आष्टीत पोस्टल मतमोजणीत सुरेश धस आघाडीवर

  • 08:27 AM, Nov 23 2024

    Marathwada Assembly Election Results Live 2024 : औरंगाबादमध्ये अतुल सावे आघाडीवर

    औरंगाबादमधून अतुल सावे आघाडीवर असल्याचे चित्र सध्या बघायला मिळतंय.

  • 08:23 AM, Nov 23 2024

    ssembly Election Result 2024 : महायुती 51 जागांवर आघाडीवर

    महायुतीचे 51 उमेदवार आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 08:22 AM, Nov 23 2024

    Marathwada Region MLA Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates : श्रीजया चव्हाण आघाडीवर

    अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण ही आगाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 08:18 AM, Nov 23 2024

    Marathwada Assembly Election Result 2024 : उदगीरमधून बनसोडे आघाडीवर

    उदगीरमधून दादा गटाचे बनसोडे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 08:15 AM, Nov 23 2024

    Marathwada Assembly Election Result 2024 : राजेश टोपे आघाडीवर

    घनसांवगीमध्ये राजेश टोपे हे पुढे आहेत. राजेश टोपेसाठी ही लढत प्रतिष्ठेची होती.

  • 08:12 AM, Nov 23 2024

    धनंजय मुंडे, अर्जुन खोतकर, विलास भुमरे आघाडीवर

    धनंजय मुंडे, अर्जुन खोतकर, विलास भुमरे यांच्या लढतीची जोरदार चर्चा होती. आता हे तिघेही आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 08:09 AM, Nov 23 2024

    marathwada Beed Election Results 2024 LIVE: परळीमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर

    परळीमध्ये धनंजय मुंडे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.

  • 08:08 AM, Nov 23 2024

    जालनातून शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आघाडीवर

    शिंदे गटाची अर्जुन खोतकर हे आघाडीवर आहेत. जालनात जोरदार सामना बघायला मिळतोय.

  • 08:06 AM, Nov 23 2024

    Marathwada Vidhan Sabha Election Result Live: पैठणमधून विलास भुमरे हे आघाडीवर

    पैठणमधून विलास भुमरे हे आघाडीवर असल्याचे अपडेट आहे

  • 08:04 AM, Nov 23 2024

    Marathwada Assembly Election Results Live: नांदेडमध्ये मतमोजणीला सुरूवात

    नांदेड लोकसभा व विधानसभेसाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील मतमोजणी केंद्रात कर्मचारी दाखल झाले आहे. १ हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. मतमोजणीच्या प्राथमिक प्रक्रियेला सुरुवात देखील झाली आहे.

  • 08:02 AM, Nov 23 2024

    माझा जनतेच्या मतांवर विश्वास- राजेसाहेब देशमुख

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या दोन दिवसात मी सर्वसामान्य माणसात फिरल्यावर माझा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे. विरोधकांचा विश्वास बोगस मतांवर आहे तर माझा विश्वास जनतेच्या मतावर आहे असे राजेसाहेब देशमुख म्हणाले आहेत.

  • 07:57 AM, Nov 23 2024

    Marathwada Beed Election Results 2024 LIVE : धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठ पणाला

    धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात जोरदार लढत बघायला मिळाली. आता दोघांपैकी कोण बाजी मारणार हे अगदी थोडयावेळात स्पष्ट होईल.

  • 07:55 AM, Nov 23 2024

    पोस्टल मतदानाच्या मतमोजणीला सुरूवात

    पोस्टल मतदानाच्या मतमोजणीला सुरूवात झालीये. अगदी थोड्यावेळात काही निकाल हाती येतील.

  • 07:53 AM, Nov 23 2024

    marathwada Hingoli Election Results 2024 LIVE : निवडणुकीच्या निकालापूर्वीच आमदार संतोष बांगर यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले

    हिंगोलच्या कळमनुरी मतदार संघाचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार संतोष बांगर यांचे हिंगोली शहरात भावी मंत्री म्हणून बॅनर लागले आहेत.

  • 07:48 AM, Nov 23 2024

    Marathwada Assembly Election Results Live Updates |परत एकदा मराठवाड्यात महायुतीला बसणार फटका?

    लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका मराठवाड्यात बसला होता. महाविकास आघाडीला फायदा झाल्याचे बघायला मिळाले.

  • 07:38 AM, Nov 23 2024

    Marathwada Parbhani Election Results 2024 LIVE: राहुल पाटील राखणार गड

    परभणीमधून उद्धव ठाकरे गटाकडून राहुल पाटील हे निवडणुकीच्या रिंगण्यात आहेत. यंदा गड राखण्याचे मोठे आव्हान राहुल पाटील यांच्यापुढे आहे.

  • 07:32 AM, Nov 23 2024

    marathwada Election Results 2024 LIVE: संजना जाधव यांची पतीविरोधात लढत

    रावसाहेब दानवे यांची लेक संजना जाधव या कन्नडमधून निवडणूक लढवत आहेत. पतीविरोधात त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

  • 07:22 AM, Nov 23 2024

    Marathwada Vidhan Sabha Nivadnuk Result Live : थोड्यात वेळात होणार मतमोजणीला सुरूवात

    अगदी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

  • 07:18 AM, Nov 23 2024

    Marathwada Vidhan Sabha Nivadnuk 2024 : संजय शिरसाट यांना राखता येणार गड

    संजय शिरसाट हे संभाजीनगर शहरातील पश्चिमचे उमेदवार असून ते उद्धव ठाकरे गटाकडून ही निवडणूक त्यांनी लढवली.

  • 07:16 AM, Nov 23 2024

    सकाळी आठ वाजता निकालाला होणार सुरूवात

    विधानसभेच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात होईल.

  • 07:15 AM, Nov 23 2024

    संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, लातूरच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा

    संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या मराठवड्यातील 46 विधानसभा निवडणुकीचे निकाल काही वेळात हाती यायला सुरूवात होईल.

  • 07:12 AM, Nov 23 2024

    हिंगोलीमध्ये विधानसभेच्या मतमोजणीची प्रक्रियेची पूर्ण तयाी

    हिंगोली विधानसभेसाठी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून थोड्यावेळात मतमोजणीला सुरूवात होईल.

  • 07:06 AM, Nov 23 2024

    नांदेडच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा

    जिल्हात विधानसभा सोबतच लोकसभा पोटनिवडणूकीत ही मतदानाची टक्केवारी वाढली आहे. एप्रिल महिण्यात पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकी पेक्षा पोट निवडणुकीत सात टक्यानी म्हणजेच १ लाख ६५ हजार एवढ मत वाढली आहे. या वाढलेल्या मताचा फायदा काँग्रेसला होणार का भाजपाला ? या बाबत चर्चा रंगली लागली आहे. तर दुसरीकडे लोकसभेची पोटनिवडणूक भाजप आणि काँग्रेस नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

  • 06:46 AM, Nov 23 2024

    अशोक चव्हाण यांचे लेक निवडणुकीच्या मैदानात

    अशोक चव्हाण यांची लेक यंदा निवडणुकीच्या मैदानात आहे. तिचे राजकिय भवितव्य या निवडणुकीमध्ये ठरणार आहे.

  • 06:45 AM, Nov 23 2024

    लातूरमध्ये चुरसीची लढत

    लातूरमध्ये चुरसीची लढत बघायला मिळणार आहे. रितेश देशमुख भावाच्या प्रचारासाठी मैदानात होता.

  • 06:44 AM, Nov 23 2024

    काही वेळामध्ये निकाल येणार पुढे

    अगदी थोड्या वेळात मतदानाचे निकाल पुढे येतील.

  • 06:44 AM, Nov 23 2024

    मराठा आंदोलनाचा बसणार फटका?

    मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा कोणाला होतो आणि तोटा कोणाला हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

  • 06:43 AM, Nov 23 2024

    मराठवाड्याच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा

    मराठवाड्यामध्ये अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे. जवळपास सर्वच पक्षांच्या सभा पार पडल्या.

  • Source link

    beed assembly election resultmaharashtra jalna assembly election resultmaharashtra latur assembly election resultmaharashtra marathwada vidhan sabha election result 2024marathwada assembly election result 2024marathwada vidhan sabha election result 2024 live newsबीड विधानसभा निवडणूक निकालमराठवाडा विधानसभा निवडणूक निकाल 2024महाराष्ट्र जालना विधानसभा निवडणूक निकालमहाराष्ट्र मराठवाडा विधानसभा निवडणूक निकाल 2024महाराष्ट्र लातूर विधानसभा निवडणूक निकाल
    Comments (0)
    Add Comment