शिंदे, फडणवीस, पवारांनी प्रत्यक्ष लाभाचं राजकारण केलं, विनोद तावडे निकालानंतर नेमकं काय म्हणाले?

Vinod Tawde on maharashtra election: राज्यातील विधासभा निवडणुकीचे निकाल लागले असून जनतेने भरघोस मतांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. महायुती आता पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असून मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. विधानसभेच्या निकालानंतर भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
शिंदे, फडणवीस, पवारांनी प्रत्यक्ष लाभाचं राजकारण केलं, विनोद तावडे निकालानंतर नेमकं काय म्हणाले?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीला झालेल्या पराभवाचा वचपा महायुती व्याजासकट वसूल केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने १३० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. राज्यात आता महायुतीचे सरकार येणार असून मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याची दाट शक्यता आहे. या निकालानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना विजयामागची काही कारणे सांगितली आहेत.

विनोद तावडे काय म्हणाले?

महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार, हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्त्वाखाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि रामदास आठवले या सर्वांनी एकत्रिक राज्यात काम केलं. अप्रत्यक्ष लाभाचं राजकारण म्हणजे रस्ते, पाणी, वीज, वंदे भारत आणि प्रत्यक्ष लाभाचं राजकारण म्हणजे लाडकी बहीण, शेतकरी सन्मान निधी, शून्यबिल या दोन्हींचा बॅलन्स शिंदे, फडणवीस आणि पवारांनी केल्याने जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसला. दुसरं म्हणजे सेना-भाजपची युती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला तोडली त्याचा बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता. रोज सळाळी राज्याचं राजकारण प्रदुषित करणार वत्तव्य भांडुपमधून यायचं. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचं धनुष्यबाण आणि शिवसेना नाव भाजपसोबत आणल्यामुळे शिंदेंना बाळासाहेबांच्या विचारांची मते त्यांना मिळाल्याचं विनोद तावडे म्हणाले.

मला असं वाटतं की देशातील सर्व निवडणुकांवरून एक दिसून येतं की मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीएवर जनतेने आपला विश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व याबाबतचा निर्णय घेईल. आज महायुती म्हणून आम्ही विजयाचा आनंद घेत असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

अमित शहांनी मुख्यमंत्रिपदबाबत पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, तिन्ह पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. यासंदर्भात कोणताही वाद-विवाद नाही. पहिल्या दिवसापासून हे ठरलं आहे की, निकालानंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन हे ठरवतील. त्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो आम्हाला सर्वाना मान्य असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

bjp leaderDevendra FadnavisEknath Shindevidhan sabha result 2024vinod tawdeविनोद तावडेविनोद तावडे मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment