Eknath Shinde Lead Shiv Sena Vijay Shivtare Wins Purandar Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघात विजय बापू शिवतारे यांनी विजय मिळवला आहे. तिरंगी लढतीमध्ये विजय शिवतारे यांनी विजयाचा गुलाल उधळलाय.
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांचे निकाल आता समोर आले आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे. पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतारे यांनी विजय मिळवला आहे. पुणे जिल्ह्यामधील चर्चेत राहिलेल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होती. शिवसेना शिंदे गटाचे विजय बापू शिवतारे यांनी २४१८८ मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार संजय जगताप यांचा पराभव केला. विजय बापू शिवतारेंना १,२५,८१९, संजय जगताप १,०१,६५१ आणि संभाजी झेंडे ४७,१९६ मते मिळाली आहेत. विजय शिवतारे हे खासदारकीसाठी इच्छुक होते पण त्यांना विधानसभेला उमेदवारी देण्यात आली. पुरंदर विधानसभा निवडणुकीमध्ये २००९ आणि २०१४ मध्ये विजय शिवतारे यांनी विजय मिळवला होता. मात्र २०१९ ला संजय जगताप यांनी विजय मिळवत शिवतारेंचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा विजय शिवतारे यांनी पुरंदरमध्ये आमदारकी मिळवली आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा