मोठी बातमी | पुण्यातील मुंबई-बेंगळुरू बायपास हायवेवर भीषण अपघात, व्हिडीओ समोर

Pune Accident News : मुंबई-बेंगळुरू बायपास हायवेवरील वारजे ओव्हर ब्रिजवर इंडियन ऑइलचा एक रिकामा पेट्रोल टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने टँकर रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली. टँकर रस्त्यात आडवा पडल्याने साताऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून, वाहने सर्विस रोडवर वळवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : मुंबई-बेंगळुरू बायपास हायवेवरील वारजे ओव्हर ब्रिजवर आज सकाळी भारत पेट्रोलियम समोर इंडियन ऑइलचा एक पेट्रोल टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने टँकर रिकामा असल्याने आग लागण्याचा धोका टळला आहे. अपघातात टँकर रस्त्यात पूर्णपणे आडवा पडला, त्याचा मागील भाग रस्त्यावर अडथळा निर्माण करत होता, तर ड्रायव्हर केबिनसह पुढचा भाग पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅकवर घुसला आणि पलीकडच्या बाजूला धडकला. सुदैवाने समोरच्या बाजूने येणारे कोणतेही वाहन त्यावेळी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. पलीकडच्या ट्रॅकवरही कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

अपघातानंतर साताऱ्याकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली असून, सध्या वाहने सर्विस रोडवर वळवण्यात आली आहेत. यामुळे सेवासुविधा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना घटनास्थळी तैनात केले असून, टँकर हटवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रथमिक माहितीनुसार, टँकरच्या वेगावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज आहे. वाहनचालकाच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Pune Accident Newspune marathi newsPune newsPune Updateपुणे अपघात बातम्यापुणे बातम्यापुणे मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment