वडिलांच्या पराभवाचा वचपा मुलाने काढला, जावळे कुटुंबाने झेंडा रोवला

Jalgaon Political News: २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्ह्यातून एकमेव आमदार निवडून आलेले शिरीष मधुकरराव चौधरी यांनी या निवडणुकीत तब्येतीचे कारण देत माघार घेतली.

हायलाइट्स:

  • रावेरमध्ये दोन राजकीय वारसदारांमध्ये लढत
  • अमोल जावळे यांनी मारली बाजी
  • वडिलांच्या २०१९च्या पराभवाचा काढला वचपा
Lipi
अमोळ जावळे

निलेश पाटील, जळगाव : रावेर मतदारसंघातील विधानसभा मध्ये निवडणुकीदरम्यान चुरस बघायला मिळत होती. कारण या मतदारसंघात दोन आजी-माजी आमदारांच्या राजकीय वारसदारांनी निवडणुकीत शड्डू ठोकले होते. या निवडणुकीत वडिलांच्या पराभवाचा वचपा मुलाने ४३ हजार मतांची आघाडी घेऊन काढला. भाजपाने रावेर विधानसभेत झेंडा रोवला.रावेर विधानसभेच्या रिंगणात भारतीय जनता पार्टी अर्थात महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे तर काँग्रेसचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्यातच लढत बघायला मिळाली. दोघे वारसदारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी उभे होते. या नवख्या उमेदवारांनी मैदान गाजवले. गेल्या २०१९च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे शिरीष मधुकरराव चौधरी यांनी भाजपचे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचा १५ हजार ६०५ मतांनी पराभव केला होता. या पराभवाला कारण होते अनिल चौधरी. अनिल चौधरी यांनी २०१९च्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी केली आणि जवळपास ४४ हजार ८४१ मत त्यांना मिळाली आणि भाजपचा उमेदवाराचा पराभव झाला होता.
Video : अजितदादांनी सांगितला नरेंद्र मोदी आणि सुनील शेळके यांच्या भेटीचा किस्सा, मी मोदींना सांगितलं की…

२०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्ह्यातून एकमेव आमदार निवडून आलेले शिरीष मधुकरराव चौधरी यांनी या निवडणुकीत तब्येतीचे कारण देत माघार घेतली. जळगाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रथम उमेदवारी जाहीर झालेले शिरीष मधुकरराव चौधरी यांची चौथी पिढी धनंजय चौधरी यांना बाळासाहेब थोरात यांनी खिरोदा येथे कृतज्ञतासोहळ्यात उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसच्या दुसऱ्या गटातून तीव्र विरोध जाणवू लागला. घराणेशाहीला विरोध करत रावेरचे माजी नगराध्यक्ष तारा मोहम्मद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांना जवळपास नऊ हजारांच्या जवळ मतं मिळाली.

महायुतीमध्ये भाजपकडून स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना रावेर विधानसभेतून उमेदवारी मिळाली आणि दोन राजकीय वारसदारांमध्ये लढाई सुरू झाली. या लढाईत कोण बाजी मारणार हीच एक चर्चा होती आणि भाजपासाठी रावेर विधानसभेची जागा खेचून आणण्यासाठी विशेष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पडद्यामागून अमोल जावळेसाठी मैदानात उतरलेला होता. भाजपासाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जात होती. त्यामुळे भाजपाला ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायची होती.या मतदारसंघात भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अमोल जावळेंसाठी सभा घ्यावी लागली.
मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनाच मिळेल अशी आशा, अब्दुल सत्तार थेट म्हणाले, मराठवाड्याला नक्की..

धनंजय चौधरींसाठी ही निवडणूक देखील तितकीच महत्त्वाची मानली जात होती. कारण अवघ्या २४व्या वर्षी धनंजय चौधरी यांना उमेदवारी मिळणे इतके सहजासहजी सोपे नव्हते. शिरीष चौधरी यांचे बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी घनिष्ठ संबंध याचाच फायदा हा धनंजय चौधरी यांच्या उमेदवारीसाठी झाला असावा? शिरीष चौधरी यांचे देखील रावेर विधानसभेमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण मुलाला कमी वयामध्ये उमेदवारी मिळाली आणि त्याला आमदार करणे हे तितकेच चौधरी परिवारासाठी महत्त्वाचे होते. कारण चौधरी घराण्याची चौथी पिढी आता या राजकीय आखाड्यात उतरलेली होती. दोघेही राजकीय वारसदारांना निवडणूकीचे मैदान मारणे तितके सोपे नव्हते. धनंजय चौधरी यांना उमेदवारी मिळाल्याने घराणेशाहीवर काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने विरोध दर्शवला होता. धनंजय हे ग्रामपंचायत निवडणूक न लढणाऱ्या उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी दिल्याने दारा मोहम्मद यांनी बंडखोरी करून उमेदवारी केली.

२०१९च्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचा शिरीष चौधरी यांनी जवळपास १५ हजार मतांनी पराभव केला होता आणि त्या पराभवाचा वचपा काढण्याची वेळ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांच्याकडे आली होती. त्यांनी कधी नव्हे रावेर विधानसभेमध्ये आतापर्यंतच्या इतिहासात १ लाख १३ हजार ६७६ मते घेऊन भाजपचा रावेर विधानसभेत दणदणीत विजय संपादित केला आणि काँग्रेसचे धनंजय चौधरी यांचा तब्बल ४३ हजार ५५२ मतांनी पराभव करून वडिलांच्या पराभवाचा वाचपा मुलाने काढला. हीच एक चर्चा रावेर विधानसभेमध्ये निकालाच्या दिवशी रंगू लागली होती.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

amol javale newsharibhau javalejalgaon raver assembly election results 2024raver assembly resultsअमोल जावळे बातम्याजळगाव रावेर विधानसभा निवडणूक निकाल २०२४रावेर विधानसभा निकालहरिभाऊ जावळे
Comments (0)
Add Comment