शहाजी बापूंसह ५ जणांना धक्का, बंडात शिंदेंना साथ देणाऱ्यांना जनतेनं नाकारलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2024, 5:36 pm

जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंना धक्का देत ४० आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं. गुवाहाटी व्हाया सुरतला एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वांना निवडून आणले नाही, तर राजकारणातून निवृत्ती घेईन असं शिंदे म्हणाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांत शिंदे यांच्या शिवसेनेनं ५७ जागा जिंकत दमदार कामगिरी केली. २०२२ बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांसह शिंदे गटाचे आणखी काही नवे आमदारही निवडून आले. मात्र त्या बंडात शिंदेंना साथ देणाऱ्या ४० पैकी ५ आमदारांना पराभवाचा धक्का बसलाय. हे पाच आमदार कोण आहेत तेच या व्हिडिओत पाहू…

Source link

Eknath Shindeshahaji bapu patilshiv senaShiv Sena Disputeएकनाथ शिंदेशहाजी बापू पाटीलशिवसेनाशिवसेना शिंदे गट
Comments (0)
Add Comment