लेक पडला, पक्षाला भोपळा; आता मनसेची मान्यता धोक्यात, राज ठाकरेंसमोर संकट; परिणाम काय होणार?

Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला सर्वात मोठा धक्का बसला. यंदा महायुतीचं सरकार येईल आणि मनसेच्या पाठिंब्यानं भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं भाकित राज ठाकरेंनी वर्तवलं होतं. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला सर्वात मोठा धक्का बसला. यंदा महायुतीचं सरकार येईल आणि मनसेच्या पाठिंब्यानं भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं भाकित राज ठाकरेंनी वर्तवलं होतं. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. मनसेचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. मागील २ निवडणुकांमध्ये मनसेला प्रत्येकी एक उमेदवार निवडून आणता आला होता. पण यंदा मनसेची पाटी कोरी लागली नाही. त्यांना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.

मनसेला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली मान्यता रद्द होऊ शकते. मान्यता कायम राखण्यासाठी काही निकष आहेत. मनसे ते निकष पूर्ण करताना दिसत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग लवकरच त्यांना नोटीस पाठवेल आणि तुमची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करेल, अशी माहिती विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दिली.
Sharad Pawar: मविआचा दारुण पराभव कशामुळे? शरद पवारांचं २ प्रमुख मुद्द्यांवर बोट, बारामतीवरुन प्रतिप्रश्न
मान्यतेचे निकष काय?
एखाद्या राजतीय पक्षाला मान्यता टिकवण्यासाठी काही निकषांची पूर्तता करणं गरजेचं आहे. निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी ८ टक्के मतं आणि १ जागा किंवा ६ टक्के मतं आणि २ जागा किंवा ३ टक्के मतदान आणि ३ जागा असे मान्यतेचे निकष आहेत. यातील कोणतेच निकष मनसे पूर्ण करताना दिसत नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते.

काय म्हणाले अनंत कळसे?
राज्यातील मतदारांची संख्या ९ कोटी ७० लाख इतकी आहे. त्यातील ६ कोटी मतदारांनी यंदा मतदान केलं अशी शक्यता गृहित धरल्यास ८ टक्के मतं मनसेसाठी गरजेची होती. तर त्यांची मान्यता कायम राहिली असती. त्यांना ४८ लाख मतं मिळणं आवश्यक होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे आता मनसेचं रेल्वे इंजिन चिन्ह काढून घेण्यात येईल. त्यांना आता निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग फ्री चिन्हांपैकी एखादं चिन्ह देईल, असं कळसेंनी सांगितलं.
Sharad Pawar: शरद पवारांचे आमदार संपर्कात! निकालानंतर दादांच्या शिलेदारानं बॉम्ब टाकला; दाव्यानं खळबळ
इंजिनाची कमी झाली गती, मनसेला ओहोटी
२००९ मध्ये मनसेचे १३ उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी मनसेला ५.७१ टक्के मतं मिळाली होती. पण यानंतर मनसेची लाट ओसरली. पक्षाला मोठी ओहोटी लागली. २०१४ मध्ये मनसेला केवळ १ जागा जिंकता आली. तेव्हा त्यांना ३.१५ टक्के मतं मिळाली होती. २०१९ मध्येही मनसेचा केवळ १ उमेदवार विजयी झाला. तेव्हा पक्षाला २.२५ टक्के मतदान झालं. आता २०२४ मध्ये पक्षाला एकाही जागेवर यश मिळालेलं नाही. त्यांना केवळ १.५५ टक्के मतदान झालं आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

election commissionMaharashtra Political NewsMaharashtra politicsMNSraj thackerayअमित ठाकरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्र राजकीय बातम्याराज ठाकरेविधानसभा निवडणूक निकाल
Comments (0)
Add Comment