‘बविआ’चा बालेकिल्ला ढासळला; नालासोपाऱ्यात राजन नाईक ३६८७५ मतांनी विजयी, तर क्षितिज ठाकूरांचा पराभव

Nalasopara Election Results 2024: पालघर आणि विक्रमगड या दोनही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. वसई मतदारसंघावर मागील ३५ वर्षे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व होते.

महाराष्ट्र टाइम्सrajan naik
rajan naik

वैष्णवी राऊत / भाविक पाटील / महेश गायकवाड पालघर : जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा जिंकून महायुतीने पालघर जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाल्याने वसई विधानसभेवर मागील ३५ वर्षांपासून असलेले ‘बविआ’चे साम्राज्य लयाला गेले आहे. विशेष म्हणजे नालासोपारा आणि बोईसरमधील बविआ आमदार पराभूत झाल्याने येथील बविआचे असलेले वर्चस्वदेखील संपुष्टात आले आहे. या दोनही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत.

डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी जागा राखली असून दुसरीकडे विक्रमगड चे आमदार सुनील भुसारा यांचा पराभव झाला आहे. पालघर आणि विक्रमगड या दोनही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. वसई मतदारसंघावर मागील ३५ वर्षे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व होते. २००९ साली ठाकुरांनी निवडणूक लढवली नव्हती. त्यावेळी वसई विधानसभा निवडणुकीत विवेक पंडित यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी पंडित यांचा पराभव केला. मात्र २०२४च्या निवडणुकीत विवेक पंडित यांच्या कन्या स्नेहा दुबे-पंडित यांनी या पराभवाचा बदल घेतल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नालासोपाऱ्यामध्ये भाजपच्या राजन नाईक यांनी बविआच्या क्षितिज ठाकूर यांचा पराभव केला आणि २०१४ च्या पराभवाचा वचपा काढला.
मंत्रिपदाची माळ कोणाला? दोन्ही ‘दादा’ महत्त्वाच्या खात्यांचे दावेदार; वळसे पाटलांनाही संधी शक्य
बोईसरमध्ये बविआच्या राजेश पाटील यांचा शिवसेना (शिंदे) पक्षाच्या विलास तरे यांनी पराभव केला. सुरुवातीपासून म्हणजेच तीन टर्म या ठिकाणी बविआचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र या निवडणुकीत या तीनही जागा महायुतीकडे गेल्या आहेत. नियोजनाचा अभाव आणि मतदारसंघात योग्य ती संघटनात्मक बांधणी केली नसल्याचा परिणाम निकालावर झाल्याचे बोलले जात आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात माजी खासदार राजेंद्र गावित शिवसेना (शिंदे) पक्ष यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या जयेंद्र दुबळा यांचा पराभव केला. गावित पूर्वी काँग्रेसमधून पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर ते शिवसेनेतून खासदार झाले. गावितांचा मतदारसंघात दांडगा संपर्क असल्याने गावित कुठल्याही पक्षात असले तरी निवडून येत असल्याचा त्यांचा इतिहास आहे. विक्रमगड येथे भाजपच्या हरिश्चंद्र भोये यांनी राष्ट्रवादी आमदार सुनील भुसारा यांचा आणि जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघात भाजपने हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी दिल्याने निकम यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या भोये यांना मतदारांनी आपलेसे केल्याने या झालेल्या तिरंगी लढतीत त्यांचा विजय झाल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर महाराष्ट्रात भाजप थोरला! ३५पैकी ३३ जागांवर महायुतीचा विजय, महाविकास आघाडीची धूळधाण
डहाणूमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी भाजपाच्या विनोद मेढा यांचा पराभव करत आपला गड कायम राखला. या मतदारसंघात पूर्वीपासून डाव्यांचे वर्चस्व असून डहाणूलगतचा शहरी भागच फक्त भाजपाच्या बाजूने आहे. तसेच निकोले यांचा साधेपणा, चळवळीतील त्यांचा सहभाग आणि कायम जनतेच्या मदतीसाठी धावून येणारे अशी ओळख आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला असून महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्यात त्यांना यश आले. जिल्ह्याचा निकाल पाहता या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी जिल्ह्यात आपले पुन्हा वर्चस्व निर्माण केले आहे. तर माकपचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व उमेदवार हे महायुतीचे असल्याने जिल्ह्यात भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे.
मनसेचे रेल्वे इंजिन यार्डातच! विधानसभा निवडणुकीत खातेच उघडले नाही, राज ठाकरेंना जनतेनं का नाकारलं?
संघटनात्मक बांधणी आणि नियोजनाचा विजय मिरा-भाईंदर मतदारसंघातून भाजपच्या नरेंद्र मेहता यांनी विजय मिळवला आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर त्यांच्याकडून जोर देण्यात आला होता. तसेच विरोधी उमेदवारामुळे मताचे विभाजन होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी त्यांच्याकडून घेतली जात होती. केंद्रातील बड्या नेत्यांच्या माध्यमातून प्रचाराचे चोख नियोजन करण्यात आले होते. यामुळे मेहता यांना विजय मिळवता आल्याचे बोलले जात आहे. अपक्ष उमेदवार जैन यांनी पाच वर्षात संघटन वाढवण्यात अपयश आले आहे. तर, काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांना अल्पसंख्यांक वगळता इतर मते वळवण्यात यश न आल्याने पराभवाला सामोरे जावे लागल्याचे बोलले जात आहे.
आमदार फरांदेंची हॅट्ट्रिक! ठाकरे गटाच्या वसंत गितेंवर मात, हिंदुत्व, लाडक्या बहिणी पावल्या
भिवंडीमध्ये आमदारांची हॅटट्रिक भिवंडी ग्रामीणमधील शिवसेनेचे शांताराम मोरे, भिवंडी पश्चिमचे भाजपचे महेश चौघुले आणि भिवंडी पूर्वचे समाजवादी पार्टीचे रईस शेख या तिन्ही विद्यमान आमदारांनी विजय मिळवला आहे. शांताराम मोरे आणि महेश चौघुले यांनी विजयाची हॅटट्रिक केली असून, रईस शेख सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. काँग्रेसचे प्राबल्य असतानाही भिवंडी पश्चिममध्ये काँग्रेसचे दयानंद चोरघे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

hitendra thakurkshitij thakurmaharashtra assembly election resultsMaharashtra Election Resultsnallasopara election resultspalghar assembly election results 2024vasai election results 2024बविआमहायुती सरकार​​डहाणू विधानसभा मतदारसंघ
Comments (0)
Add Comment