विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जरांगे यांनी भुजबळांना ‘पाडा’ असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ दिसले आहेत. त्यांनी सडकून टीका मनोज जरांगे यांच्यावर केलीये. एक दिवस अगोदर काय घडले हे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीवेळी सर्वात जास्त फटका मराठा आंदोलनाचा मराठवाड्याला बसला. मनोज जरांगे पाटील हे अनेकदा छगन भुजबळ यांना पाडा म्हणताना दिसत होते. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यावर पहिल्यांदाच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल भाष्य केले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काय घडले हे सांगताना आता छगन भुजबळ हे दिसले आहेत. त्यांनी जरांगेवर टीका केलीये.
मग प्रचार संपण्याच्या एक दिवस अगोदर सकाळपासून हाताला सलाईन लावून बसले आणि माझे काही खरे नाही सर्व मराठ्यांनी एकत्र या मुलांसाठी वगैरे काय होते. मला पाडा पाडा म्हणून सतत जरांगेकडून सांगण्यात आले. समाजाच्या लेकऱ्यांसाठी करा म्हणत होता. या निवडणुकीमधून हे स्पष्ट झाले की, ओबीसींसोबतच मराठा समाजानेही महायुतीला साथ दिलीये. फक्त मलाच नाही तर देवेंद्र फडणवीसला पण पाडायला जरांगेकडून सांगण्यात आले. मात्र, जरांगे यांचे बोलणे कोणीच ऐकले नाही.