महायुतीचा महाविजय, लाडक्या बहिणींकडून सत्कार, एकनाथ शिंदेंनी मानले आभार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 8:50 am

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीचा महाविजय झाला. या विजयानंतर महायुतीकडून सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा परिणाम मतदानाच्या रूपातून दिसून आला. अशातच लाडक्या बहिणींनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. यावेळी महिलांनी एकनाथ शिंदेंचं औक्षण आणि सत्कार केला. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असणार, शिंदेच मुख्यमंत्री होणार अशा घोषणा महिलांनी दिल्या. तर शिंदेंनी देखील महायुतीला साथ दिल्याबद्दल सगळ्या बहीणींचे आभार मानले.

Source link

Eknath Shindeladki bahin yojanamaharashtra cmmahayutiVarsha Bungalowएकनाथ शिंदेमहायुती सरकारमहाराष्ट्र मुख्यमंत्रीलाडकी बहीण योजना
Comments (0)
Add Comment