महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळतंय. महायुतीकडून अजून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात नाही आली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी एकजण मुख्यमंत्री होणार आहे. मुख्यमंत्रीपदाबद्दल महायुतीमधील मोठे नेते भाष्य करणे टाळताना दिसत आहेत. मुख्यमंत्रीपदसाठी अजित पवार गटाची भूमिका महत्वाची राहणार आहे.

देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकजण मुख्यमंत्री होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट आहे. रविवारी झालेल्या बैठकीत अजित पवार आणि त्यांच्या सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यास पाठिंबा दिला. अजित पवार गट शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या बाजूने नाही, असे सुत्रांकडून सांगितले जातंय. अजित पवार यांची स्वतः ची इच्छा आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत.
शिंदे गटाच्या उमेदवारांची इच्छा आहे की, परत एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावे. लाडकी बहिण योजनेचा फायदा महायुतीला झालाय. मराठा आरक्षणाचा फटका नक्कीच महायुतीला बसला नाहीये. लवकरच मुख्यमंत्री पदाबद्दल आता निर्णय घेतला जाऊ शकतो. महायुतीमधील बडे नेते हे मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य करणे टाळत आहेत. एकनाथ शिंदे यांना देखील मुख्यमंत्रीपदाबद्दल विचारण्यात आले. पण त्यांनी त्यावर काहीच भाष्य न करता निघून गेले.