साप्ताहिक अंकशास्त्र, 25 नोव्हेंबर To 1 डिसेंबर 2024 : मूलांक 5 धनलाभाचा योग, चांगली बातमी मिळणार ! मूलांक 9 असणाऱ्यांनी खर्चाकडे लक्ष द्या ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Weekly Numerology Prediction 25 November To 1 December 2024 : नोव्हेंबर महिन्यातील हा शेवटचा आठवडा आहे. या आठवड्यात तीन शुभ ग्रहांचा त्रिग्रही योग तयार होतो आहे. चंद्र, सूर्य आणि बुध एकसाथ वृश्चिक राशी संक्रमण करणार आहेत. या संक्रमणाचा शुभलाभ प्रत्येक मूलांकावर नक्की होईल. मूलांक 1 सह या मूलांकाचे लवलाइफ उत्तम असून करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात नफा आहे. मूलांक 6 सह या मूलांकांना प्रोजेक्टमध्ये यश आणि सगळीकडे कौतुक होईल. या मूलांकाचे टेन्शन थोडे वाढेल पण काळजी करू नका सगळंकाही ठिक होईल. तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
साप्ताहिक अंकशास्त्र, 25 नोव्हेंबर To 1 डिसेंबर 2024 : मूलांक 5 धनलाभाचा योग, चांगली बातमी मिळणार ! मूलांक 9 असणाऱ्यांनी खर्चाकडे लक्ष द्या ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Weekly Numerology 25 November To 1 December 2024: नोव्हेंबर महिन्यातील हा शेवटचा आठवडा आहे. या आठवड्यात तीन शुभ ग्रहांचा त्रिग्रही योग तयार होतोय. मूलांक 1 साठी लवलाइफ चांगले आणि प्रोजेक्ट यशस्वी होतील. मूलांक 3 ला करिअरमध्ये यश तर मूलांक 4 ने लक्षात ठेवा खर्च जास्त होतोय, बजेट कोलमडेल तर मूलांक 6 साठी सुखसमृद्धीचे योग असून कार्यक्षेत्रात प्रगती आहे. मूलांक 8 ला प्रत्येक कामात यश आहे पण खर्च जास्त होईल मूलांक 9 असणाऱ्यांना मेहनत जास्त करावी लागेल, खर्चाकडे लक्ष द्या. चला तर जाणून घेऊया मूलांक 1 ते मूलांक 9 पैकी कोणत्या मूलांकाचे लोक या आठवड्यात भाग्यशाली ठरतील.

मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): लवलाइफ चांगली, प्रोजेक्ट यशस्वी

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून लवलाइफ चांगली असेल. ऑफिस आणि व्यवसायात सुधारणा होते आहे. तुमचे प्रोजेक्ट यशस्वी होतील. आर्थिक बाबतीत काळजी घ्या आणि अनावश्यक खर्च कमी करा. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळेल. घरात वातावरण ठिक असेल.

मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): नवीन गोष्टी शिकणार, कामे मार्गी लागणार

हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असून नोकरी आणि व्यवसायात प्रगती आहे. तुम्ही हुशारीने प्रोजेक्टमध्ये निर्णय घेतले तर कामे पटापट मार्गी लागतील. तुम्ही नवीन गोष्टी शिकणार आहात त्यामुळे कार्यक्षेत्रात काम करताना तुम्हाला उत्तम फायदा होईल. आर्थिक बाबतीत यश आणि भागीदारीत केलेल्या गुंतवणुकीमुळे लाभ होईल. लवलाइफ चांगली असून आठवड्याच्या शेवटी तुम्ही कोणत्यातरी गोष्टीमुळे अस्वस्थ असाल.

मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): करिअरमध्ये प्रगती

हा आठवडा तुमच्यासाठी चांगली असून करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही जे प्रोजेक्ट्स हातात घेतले आहेत ते पूर्ण करणार आहात. लवलाइफ ठिक असेल. आर्थिक बाबतीत खर्च जास्त आहे त्याकडे नीट लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी काही नुकसान किंवा दुरावा याचा सामना करावा लागू शकतो.

मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): खर्च जास्त होतोय, बजेट कोलमडेल

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून प्रोजेक्टसंदर्भात चांगली बातमी मिळणार आहे. आर्थिक बाबतीत खर्च अधिक आहे खास करून महिला जास्त खर्च करत आहेत यामुळे तुमचे महिन्याचे बजेट कोलमडू शकते. लवलाइफ ठिक आहे एकमेकांमध्ये संवाद व्यवस्थीक असावा. आठवड्याच्या शेवटी सुखसमृद्धीचे योग आहेत.

मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): धनलाभाचे योग, चांगली बातमी मिळणार

हा आठवडा तुमच्यासाठी ठिक आहे. धनलाभाचे योग आहेत. आर्थिक फायदा जास्त त्यामुळे गुंतवणुकीचा विचार करू शकता. या आठवड्यात केलेली मेहनत तुम्हाला भविष्यात भरपूर लाभ देणार आहे. नवीन संधी येतील त्यातून लाभ मिळेल. लवलाइफमध्ये थोडे रूसवे फुगवे आहेत काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी सुखद बातमी मिळाल्याने ताणतणाव कमी होईल.

मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): प्रोजेक्टमध्ये यश, सुखसमृद्धीचा योग

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून कार्यक्षेत्रात प्रगती आहे. तुम्ही जे प्रोजेक्ट हाती घेतले आहे त्यात उत्तम यश मिळेल. या आठवड्यात सुख आणि समृद्धीचा शुभयोग आहे आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल अशून गुंतवणूकीचा निर्णय घेवू शकता. लवलाइफमध्ये ताणतणावाची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी काही महत्त्वाचे निर्णय घेवू शकता त्यासाठी सखोल विचार करा

मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): ऑफिसमध्ये कौतुक, प्रोजेक्ट यशस्वी

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून नोकरी आणि व्यवसायात उत्तम प्रगती आहे. एखादे नवीन प्रोजेक्ट तुमचे लक्ष वेधून घेईल. या आठवड्यात तुम्हाला प्रोजेक्टद्वारे उत्तम यश मिळेल. ऑफिसमध्ये कौतुक होईल. आर्थिक बाबतीत धनलाभ असून व्यावसायिक यात्रा यशस्वी होईल. लवलाइफ ठिक आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जीवनशैलीत काही बदल होऊ शकतात.

मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): प्रत्येक कामात यश, खर्च जास्त

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून तुम्ही जिथे काम करता तिथे तुमचे कौतुक होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती प्रतिकूल असू शकते त्यामुळे खर्च कमी करा. लवलाइफ ठिक आहे. आठवड्याच्या शेवटी संवादाने परिस्थिती सुधारु शकते.

मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): मेहनत जास्त करावी लागेल, खर्चाकडे लक्ष द्या

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. मेहनत जास्त करावी लागेल पण उत्तम लाभ होणार आहे. महिलांच्या पाठिंब्यामुळे जीवनात सुख समृद्धीचे शुभ योग येतील. आर्थिक बाबतीत खर्च जास्त आहेत त्यामुळे वेळेवर लक्ष द्या. लवलाइफमध्ये थोडा तणाव असेल, मतभेद होतील, काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती प्रतिकूल होण्याची शक्यता आहे त्यामुळे विचार करून निर्णय घ्या.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

numerology horoscopeWeekly Numerology 25 November To 1 December Weekly Numerology Rashifal in marathiWeekly Numerology Predictionकसा असेल माझा आठवडा?घरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?व्यवसायात नफा होईल?​साप्ताहिक अंक ज्योतिष
Comments (0)
Add Comment