तुमचे आमदार आमच्या संपर्कात, शिंदे गटाचे दावे, २० जणांना मातोश्रीवर बोलवत ठाकरेंचा मोठा निर्णय

Shiv Sena UBT MLA Affidavit : ठाकरे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेसेनेने केला. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला, कारण ९५ जागा लढवूनही ठाकरे गटाला अवघ्या वीसच जागांवर विजयाचा गुलाल उधळता आला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या नवनिर्वाचित २० आमदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक आमदाराकडून शपथपत्र लिहून घेतलं जाणार आहे.

शिंदे गटाचे दावे, ठाकरेंची सावध पावलं

उद्धव ठाकरे यांना पक्षफुटीचा अनुभव आहे. दरम्यानच्या काळातही अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. एकीकडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

शपथपत्र लिहून घेणार

ठाकरे गट नवनिर्वाचित २० आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार आहे. पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहणार असून सर्व आमदार या निर्णयाशी बांधील असतील, असं यात नमूद केलं जाणार आहे. गटनेते आणि प्रतोद निवडीसंदर्भातही आजच निर्णय होणार आहे. यासाठी आदित्य ठाकरे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांची नावं चर्चेत असल्याची माहिती आहे.
Maharashtra New CM : मुख्यमंत्रिपदाचा फिरता चषक! नव्या फॉर्म्युलाची चर्चा, तिघंही CM होणार, कोणाचा नंबर कधी?

मातोश्रीवर आमदारांना मार्गदर्शन

मातोश्रीवर उपस्थित आमदारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असून यावेळी विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाच्या कारणांवरही चर्चा होणार असल्याचं समजतं. विरोधीपक्ष नेतेपदासाठी आवश्यक संख्याबळही महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला न मिळाल्याने हे पद रिक्त राहण्याची शक्यता आहे.
Ram Shinde : अजितदादा प्रीतिसंगमावर रोहित पवारांना जे बोलले, ते राम शिंदेंनी हेरलं; म्हणतात यांनी कौटुंबिक करारातून मला कट रचून पाडलंय!

ठाकरे गटाचे शिलेदार कोण?

सुनील राऊत, सुनील प्रभू, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, अजय चौधरी या मुंबईकर आमदारांसह नितीन देशमुख, कैलास पाटील, दिलीप सोपल, भास्कर जाधव हे नऊ आमदार पुन्हा निवडून आले आहेत.

याशिवाय, वरुण सरदेसाईंच्या रुपाने नवा आमदार ठाकरे गटाला मिळाला आहे. अनंत (बाळा) नर, महेश सावंत, हरुन खान, मनोज जामसूतकर अशा पाच मुंबईकरांसह सिद्धार्थ खरात, गजानन लवाटे, संजय देरकर, राहुल पाटील, बाबाजी काळे, प्रवीण स्वामी एकूण ११ जण पहिल्यांदा आमदार झाले आहेत.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Maharashtra Election Results 2024Maharashtra politicsUddhav ThackerayVidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरे मातोश्री बैठकठाकरे गट आमदार यादीराजकीय बातम्याविधानसभा निवडणूक निकाल २०२४शिवसेना ठाकरे गट आमदार शपथपत्र
Comments (0)
Add Comment