विधानपरिषद नको कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे, लक्ष्मण हाकेंची मोठी मागणी

Laxman Hake Demand For Cabinet Ministry: ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी मला गृह मंत्री किंवा महसूल मंत्री करा, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

Lipi

आदित्य भवार, पुणे: विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश प्राप्त झाला आहे. तिन्ही पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि सायलेंट ओबीसी फॅक्टर महायुतीला सर्वधिक फायदेशीर ठरेल आहे.

तर मराठा आंदोलनकर्ते मनोज जारांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. यानंतर आता लक्ष्मण हाके यांची डिमांड देखील वाढली आहे. महसूल, गृह किंवा अर्थ खातं म्हणजे कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा आज त्यांनी व्यक्त केली आहे. सोबतच त्यांनी जरांगे आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.

लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत, काही मोठे खुलासा केले आणि साथ-साथचा फॉर्मुला देत ओबीसी फॅक्टरचे आमदार निवडून आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Beed News: मुंडे बहीण-भाऊ निवडणुकीत एकत्र, मंत्रिपदासाठी आमनेसामने, बीडमध्ये मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
लक्ष्मण हाके म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच इतर योजना याचा फायदा झाला. पण महाराष्ट्रामध्ये अंडरकरंट होता तो ओबीसी फॅक्टरचा गावगाड्यातला ओबीसी हा भाजपासोबत उभा राहिला आणि त्याच प्रत्यंतर महाराष्ट्रच्या विधानसभेवर दिसून आलं.

तुमच्यावर महाविकास आघाडीची सुपारी घेतल्याचा आरोप होत आहे? याबाबत हाके यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हो मी ओबीसीची सुपारी घेतली होती, ओबीसींच्या हक्काची, हिताचं सरकार अणण्याची सुपारी मी घेतली होती. शरद पवार, टोपे, रोहित पवार यांना पराभूत करण्याची सुपारी मी घेतली होती आणि आम्ही घेऊ शकतो सुपारी यांच्या विरोधात’. पुढे हाके असं म्हणाले की, आम्ही करेक्ट कार्यक्रम राज्यात केला आहे. जे कोणी नेते हवेत गेले होते त्यांना जमिनीवर, अगदीच नाव घ्यायचं झालं तर मनोज जरांगे आहेत, राजेश टोपे आहेत, शरद पवार आहेत, रोहित पावरांचे तर आम्ही कान कापले आहेत. ते आता कुठेच वर जाऊ शकत नाही.

जरांगे म्हणले होते आम्ही गनिमी कावा वापरत विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिले नाही. याबाबत हाके यांनी प्रक्रिया दिली आहे की, “शेपूट घालून पळून जाण्याला गनिमी कावा नाही म्हणत, आधी रणांगणात उतरावं लागतं, लढावं लागतं. फक्त येवल्यात जाऊन छगन भुजबळ यांना टार्गेट करणं हा गनिमी कावा असतो का? त्यांचा गनिमी कावा त्यांच्यावर उलटा बूमरँग झाला आहे.

Laxman Hake: विधानपरिषद नको महसूल, गृह किंवा अर्थ खातं पाहिजे, लक्ष्मण हाकेंची मोठी मागणी, पाहा काय म्हणाले…

ओबीसीचे अनेक प्रश्न आहे. गावगड्या वस्तीत ओबीसींना आपला हक्क मिळाला पाहिजे म्हणून मला महसूल मंत्री करावा जेणेकरून ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न सुटतील किंवा गृह मंत्री पद द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

laxman hakemaharashtra assembly elections resultsPune newsvidhan sabha nivadnuk 2024vidhansabha nivadnuk nikalओबीसी नेते लक्ष्मण हाकेमनोज जरांगेमहायुती सरकारलक्ष्मण हाकेविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment