खानदेशात महायुतीचा स्ट्राईक रेट जोमात, पण केवळ एक जागेवर शिवसेनेमुळे अजित पवारांचा घात

Nandurbar News : नंदुरबारमध्ये महायुतीला यश आलं असून २० पैकी केवळ एका जागेवर काँग्रेसला यश मिळालं आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला नवापूरमध्ये शिरीष नाईक हे विजयी झाले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यामुळे विजय मिळाल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महेश पाटील, नंदुरबार : खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये कधी नव्हे ते काँग्रेसला धोबीपछाड देण्यात महायुतीला यश आले आहे. २० पैकी केवळ एका जागेवर काँग्रेसला खाते उघडण्यात यश आले आहे. यामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नवापूरच्या शिरीष नाईक यांचा निसटता विजय झाला आहे. याचे श्रेय मात्र शिंदे शिवसेनेचे संपर्क प्रमुख असलेल्या नेत्याला जात आहे. डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित यांना शह देण्यासाठीच शिंदे गटाच्या नेत्याने खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी काँग्रेसला किमान खाते तरी उघडता आले, अशीच चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी ठाण्यात देवाला साकडे, मंदिरांमध्ये महिलांच्या महाआरत्या, दर्ग्यातही सामूहिक प्रार्थना
नवापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे भरत गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक आणि डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. या ठिकाणी तिरंगी लढतीत काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक यांना ८७ हजार १६६, अपक्ष शरद कृष्णराव गावित ८६ हजार ५४, तर राष्ट्रवादीचे भरत माणिकराव गावित यांना ५६ हजार १७६ मते मिळाल्याने पोस्टल मतदानाच्या आधारावर काँग्रेसचे शिरीष नाईक १ हजार १२१ मताधिक्याने विजयी झाले. खानदेशमध्ये वीस जागांपैकी महाआघाडीकडून एकमेव जागा नवापूरची आली आहे.
गोविंदाच्या जावयावर पैशांचा पाऊस, IPL लिलावात मोठी बोली; राजस्थान रॉयल्सकडून कितीला खरेदी?

शिंदे शिवसेनेच्या नेत्यामुळे विजय

राष्ट्रवादीतर्फे भरत गावित यांची उमेदवारी दाखल करताना शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचे कार्यकर्ते भरत गावित यांच्यासोबत होते. भरत गावीत यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभा घेतली होती. त्यावेळी शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी हेही उपस्थित होते. अजित पवार यांच्या सभेतच डॉ. विजयकुमार गावित आणि त्यांच्या परिवारावर त्यांनी टीका केली. तसेच अजित पवार यांनीही गावित परिवारावर टीका केली होती.

खानदेशात महायुतीचा स्ट्राईक रेट जोमात, पण केवळ एक जागेवर शिवसेनेमुळे अजित पवारांचा घात

निवडणुकीच्या दोन दिवस आधी शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित यांना शह देण्यासाठीच काँग्रेसला मदत केली. चंद्रकांत रघुवंशी यांचे नंदुरबार तालुक्यातील चार गट नवापूर विधानसभेला जोडलेले आहेत. त्यामध्ये त्यांची चांगली ताकद आहे. त्याचाच फायदा काँग्रेसला झालेला दिसला. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नवापूरला शिरीष नाईक यांचा निसटता विजय झाला आहे. याचे श्रेय मात्र शिंदे शिवसेनेचे संपर्क प्रमुख असलेल्या नेत्याला जात आहे. असे असले तरी खानदेशात काँग्रेसला किमान खाते तरी उघडता आले, अशीच चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एका जागेचा फटका बसला आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Nandurbarnavapur nandurbarvijaykumar gavitनंदुरबार बातमीनंदुरबार विधानसभा निवडणूकनवापूर विधानसभा बातमीविजयकुमार गावितशिरीष नाईक नवापूर विधानसभा
Comments (0)
Add Comment