शिंदेच व्हावेत पुन्हा मुख्यमंत्री! शिवसेनेची एकमुखी मागणी, ६ प्रमुख कारणांची यादीच वाचली

विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु आहेत. भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपद मित्रपक्षांना सोडण्यास तयार नाही. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यास उत्सुक आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु आहेत. भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपद मित्रपक्षांना सोडण्यास तयार नाही. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यास उत्सुक आहेत. शिवसेनेच्या नेत्यांचीदेखील हीच मागणी आहे. रविवारी वांद्रे येथील एका हॉटेलात शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली. त्यात शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपदी कायम का ठेवण्यात यावं, यामागील कारणांची यादीच वाचण्यात आली.

१. शिवसेना उबाठाला चाप: शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा फायदा महायुतीला झाला. सगळ्यात पॉवरफुल पद शिंदेंकडे असल्यानं शिवसैनिक, पदाधिकारी, नेते ठाकरेंना सोडून गेले. त्यामुळे ठाकरेसेना कमकुवत झाली. त्याचा फायदा महायुतीला निवडणुकीत झाला. आता शिंदेंना मुख्यमंत्रिपद सोडायला सांगितल्यास ठाकरेंना भाजपवर हल्ला करण्याची संधी मिळेल. भाजपनं सत्तेत येण्यासाठी शिवसेना नावाचा, चिन्हाचा वापर केला आणि सत्ता मिळताच त्यांना बाजूला टाकलं, अशी टीका करण्याची संधी भाजपला मिळेल.
CM पद सोडा, त्याबदल्यात…; भाजपकडून शिंदेंना ऑफर, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला
२. मराठा अस्मिता- शिंदे यांच्या रुपात महायुतीला तगडा मराठा नेता मिळाला आहे. मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम रडारवर राहिले. त्यामुळे मराठ्यांचा रोष काही प्रमाणात भाजपविरोधात दिसला. पण शिंदेंकडे सरकारचं नेतृत्त्व असल्यानं रोष काही प्रमाणात कमी झाला.

३. सुशासन कायम राखण्याचा संदेश- शिंदेंच्या नेतृत्त्वात महायुती सरकारनं अनेक कल्याणकारी योजना आणल्या. महायुतीच्या विजयात योजनांचा मोठा वाटा आहे. तेच मुख्यमंत्री राहिल्यास महायुती सरकारची जनमानसातील प्रतिमा कायम राहील. त्याचा फायदा सरकारला होईल.

४. जातीय विभाजनाला चाप- गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला एक तगडा मराठा चेहरा हवा होता. शिंदेंमुळे महायुतीला तसा चेहरा मिळालेला आहे. शिंदे मुख्यमंत्रिदावर कायम राहिल्यास जातीय विभाजन टाळता येईल. मराठा, ओबीसी अशा दोन्ही समुदायांना हाताळण्याची किमया शिंदे साधू शकतात.
भाजपला रोखा, मविआची सत्ता आणा! ओवेसींच्या नेत्यानं सांगितला सरकार स्थापनेचा भन्नाट फॉर्म्युला
५. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलल्यास जनता सरकारच्या कामाचं पुन्हा मूल्यांकन करेल. त्याचा फटका महायुतीला बसू शकतो. महायुतीला आताचा फॉर्म कायम राखायचा असेल तर शिंदेच मुख्यमंत्रिपदी कायम राहायला हवेत. त्याचा लाभ पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल.

६. लोकप्रिय चेहरा, नेतृत्त्व क्षमता- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय असल्याचं अनेक सर्व्हेंमधून समोर आलं आहे. त्यांनी तीन पक्षांमध्ये समन्वय राखून सरकार चालवण्याची किमया साधली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भाजपविरोधात वातावरण जवळपास संपुष्टात आणलं. नेतृत्त्वाचा चेहरा तेच होते. त्यासोबतच त्यांनी निवडणूक यंत्रणादेखील उत्तम हाताळली, याचे दाखले दिले जात आहेत.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpmaharashtra assembly electionMaharashtra politicsshiv senaउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमहायुती सरकारमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाविकास आघाडीशिवसेना
Comments (0)
Add Comment