Eknath Shinde MP Meet PM Narendra Modi: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरु असताना चार माजी खासदार आणि सात आजी खासदार यांनी भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळे या घडामोडीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
हायलाइट्स:
शिवसेनेचे खासदार PM नरेंद्र मोदींना भेटणार
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग करणार?
राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेचा आज कार्यकाळ संपतो आहे. अशात शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. तसंच महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याचदरम्यान, राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंचे सात आजी खासदार आणि चार माजी खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. खासदारांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरु असताना चार माजी खासदार आणि सात आजी खासदार यांनी भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळे या घडामोडीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आजी आणी माजी खासदार हे दोन्हीही यादरम्यान उपस्थित असतील. नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करण्यासाठी ही वेळ मागितली असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अशातच खासदारांनी देखील आक्रमक पवित्रा घेतेलेला आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप या वेळेसंदर्भात कोणतीही माहिती पीएमओ (PMO) कार्यालयातून आलेली नाहीय. पंतप्रधानांना भेटून शिवसेनेच्या हाताला काय लागणार? हे पाहणं देखील तितकेचं महत्त्वाचं असणार आहे. Uddhav Thackeray : अमित ठाकरेंना पाडणाऱ्या शिलेदाराला उद्धव यांचं खास गिफ्ट, पाहून राज ठाकरेंनाही वाटेल अभिमान
दरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने भरघोस यश मिळवत विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. मात्र अद्यापही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कुठल्या पक्षाचा चेहरा पाहायला मिळणार, हा तिढा सुटलेला नाही. अशातच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मध्यरात्री ‘एक्स’ सोशल मीडियावरुन ट्वीट करत समर्थकांना आवाहन केलं आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो, असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा