देवाभाऊ CM व्हावेत ही तर दादांची इच्छा! फडणवीसांठी NCP इतकी आग्रही का? ३ महत्त्वाची कारणं

Ajit Pawar: मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु झालेली आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर मागील ५ वर्षे सर्वात मोठा पक्ष असूनही मुख्यमंत्रिपदापासून दूर राहिलेला भाजप आता सर्वोच्च पदाबद्दल कोणतीही तडजोड करण्यास नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं. महायुतीनं तब्बल २३० जागा जिंकत इतिहास रचला. सत्तेत असलेल्या आघाडीला पहिल्यांदाच इतक्या जागा मिळाल्या. पण यानंतर आता मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु झालेली आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर मागील ५ वर्षे सर्वात मोठा पक्ष असूनही मुख्यमंत्रिपदापासून दूर राहिलेला भाजप आता सर्वोच्च पदाबद्दल कोणतीही तडजोड करण्यास नाही. शिवसेना, भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असनाना राष्ट्रवादीनं आपला पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत फडणवीस बरेच पुढे आहेत.

मुख्यमंत्रिपदी शिंदे असण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस असलेले राष्ट्रवादीसाठी सोयीचं आहे. अजित पवारांचे फडणवीस यांच्याशी उत्तम संबंध आहेत. २०१९ मध्ये सत्तानाट्य सुरु असताना दोघांनी अचानक राजभवन गाठत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण दोघांचं सरकार केवळ ८० तास टिकलं. पण २०२३ मध्ये दोन्ही नेते पुन्हा सोबत आले. त्यांनी शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदावर काम केलं.Eknath Shinde: CMपदासाठी पाठिंबा द्या! शिवसेनेकडून NCPला संपर्क; पडद्यामागे वेगवान घडामोडी, तासभर चर्चा
१. अजित पवारांची प्रशासनावर चांगली पकड आहे. प्रशासनाला आर्थिक शिस्त असावी असा त्यांचा आग्रह असतो. विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंनी काही लोकानुनयी घोषणा केल्या. त्या अजित पवारांच्या पचनी पडल्या नव्हत्या, अशी चर्चा होती. त्याआधी राष्ट्रवादीच्या आमदार, मंत्र्यांच्या फाईल पास केल्या जात नसल्याचा प्रकार घडला होता. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून फाईलवर सह्या होत नसल्यानं मतदारसंघातील काम रखडल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासगीत सांगत होते.

२. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना दोन्ही प्रादेशिक पक्ष असल्यानंदेखील त्यांच्यात स्पर्धा आहे. अनेक ठिकाणी त्यांच्यात खटके उडतात. वर्चस्वाची स्पर्धा कायम सुरु असते. अदिती तटकरेंना पुन्हा रायगडचं पालकमंत्री होऊ देणार नाही, अशी भूमिका निकालाला काही तास उलटत नाहीत तोच शिवसेनेच्या आमदारांनी घेतलेली आहे. शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यास त्यांचं सामर्थ्य नक्कीच कमी होईल. त्याचा फायदा अजित पवारांना पक्षवाढीसाठी होऊ शकतो.
तिढा सुटला, सस्पेन्स संपला, महायुतीचा मुख्यमंत्री ठरला; पुन्हा २ उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न?
३. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खरे स्पर्धक एकनाथ शिंदेच आहेत. कारण दोघांच्या पक्षांची मतपेढी एकच आहे. शिवसेना मजबूत झाल्यास भाजपच्या वाढीवर मर्यादा येतात. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद गेल्यास शिवसेना वरचढ ठरण्याची शक्यता वाढते. कोणत्याही खात्यानं घेतलेले निर्णय, केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे मुख्यमंत्री असलेले शिंदे अजित पवारांना वरचढ चढतात. ते आपल्या नेत्यांना बळ देतात. त्यांच्याशी दोन हात करणं अजित पवारांना जड जातं. पण तेच शिंदे जर अजित पवारांसारखेच उपमुख्यमंत्री झाले, तर मग राष्ट्रवादीला मैदानावरील वर्चस्वाची लढाई सोपी जाते.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

ajit pawarDevendra FadnavisEknath ShindeMaharashtra politicsअजित पवारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र मुख्यमंत्रीमहाराष्ट्र राजकीय बातम्याविधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment