Mumbai AQI Air pollution Bad Condition : मुंबईत हवेचा स्तर अतिशय खराब पातळीवर पोहोचला असून चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत नोंदवली गेलेली हवेची गुणवत्ता खराब पातळीवर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
शहरात धुकंही दिसत आहे. हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एफ समीर यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी मुंबईतील हवेची सरासरी गुणवत्ता १९० AQI नोंदवली गेली. इतक्या प्रमाणात नोंदवली गेलेली गुणवत्ता आरोग्यासाठी हानीकारण असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, १०० किंवा त्यापेक्षा कमी AQI (एअर क्वालिटी इंडेक्स) समाधानकारक मानला जातो. मात्र १०० किंवा त्याहून अधिक AQI धोकादायक असल्याचं मानलं जातं.
मुंबईतील या भागात सर्वात खराब हवा
मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी हवेचा स्तर सर्वाधिक २८४ एक्यूआय नोंदवला गेला आहे. त्याशिवाय चेंबूरमध्ये २५५, बीकेसीमध्ये २३४ आणि शिवडी येथे हवेची गुणवत्ता २२६ इतकी नोंदवण्यात आली आहे. याशिवाय, इतर सर्व ठिकाणी हवेची गुणवत्ता पातळी जवळपास १०० ते २०० AQI दरम्यान इतकी होती.
पुढील ३ आठवडे अशीच राहणार हवेतील प्रदूषणाची स्थिती
हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी सरकारी संस्था, SAFAR चे संचालक गुफरान बेग यांनी सांगितलं, की मुंबईच्या AQI मध्ये पुढील तीन आठवड्यांत सुधारणा होण्याची शक्यता फारच कमी आहे. वाहनं, शहरातील बांधकामं आणि कंपन्यांमधून निघणारा धूर ही मुंबईतील प्रदूषणाची प्रमुख कारण असल्याचं ते म्हणाले.
मुंबईकरांची चिंता वाढली! वायू प्रदूषण धोकादायक स्तरावर; या भागात सर्वात खराब हवा, तज्ज्ञांनी कारणही सांगितलं
कारण काय?
त्याशिवाय समुद्रावरून येणारे वारे मुंबईतील प्रदूषणाचे कण वाहून नेतात, पण आता तापमानात घट झाल्याने आणि वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हे प्रदूषणाचे, धुळीचे कण जास्त काळ इथेच वातावरणात राहतात. त्यामुळे सध्या या वातावरणात प्रदूषणापासून दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलं आहे. बीकेसी आणि घाटकोपरमध्ये अधिक वाहनांमुळे प्रदूषणाची पातळी कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.