दिनांक… ९ ऑक्टोबर १९८९… सुरेश दुबे नावाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली… ज्यानंतर नालासोपारा स्टेशनही हादरले. या हत्येतील गुन्हेगार होते जयेंद्र उर्फ भाई ठाकूर… अवघ्या प्लॉट घेण्याच्या कारणावरून हा खून झाला होता. उत्तर भारतातून येऊन वसईत स्थायिक झालेल्या सुरेश दुबे यांनी भाई ठाकूर यांना भूखंड देण्यास नकार दिला होता. हायप्रोफाईल प्रकरणात राजकीय ताकद वापरली गेली. केस चालू असताना रिव्हॉल्व्हरही बदलण्यात आली आणि इतर पुरावेही नष्ट करण्यात आल्याचा आरोप आहे. हे सगळं प्रकरण वसईतील नागरिक, सजक लोक, श्रमजिवी संघटने मार्फत विवेक पंडीत यांनी लावून धरलं होतं… आंदोलनं सुरू होती. हे संपूर्ण प्रकरण विवेक पंडित हाताळत असताना भाई ठाकूर यांचे बंधू हितेंद्र ठाकूर राजकारणात सक्रिय झाले. सलग अनेक विजयानंतर वसईत ठाकूर घराण्याचे वर्चस्व वाढले. त्यांनाही कुणीच हरवू शकत नव्हतं. हत्येच्या घटनेला आता ३५ वर्ष झालीयेत… पण हेच प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते विधानसभेच्या निवडणुकीत स्नेहा दुबे-पंडित यांनी बाजी मारल्यामुळे….आधी वडिलांचा संघर्ष, मग सासऱ्याचा खून आणि ३५ वर्षांनी राजकीय बदला घेतलेल्या स्नेहा दुबे-पंडित नेमक्या कोण आहेत? तेच या व्हिडिओत पाहू….