पुन्हा एल्गार !आंतरवाली सराटीत होणार सामूहिक आमरण उपोषण – मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Nov 2024, 4:40 pm

Beed:मनोज जरांगे पाटील यांनी सरकार स्थापन होताच पुन्हा आंतरवली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक उपोषण करणार असल्याचं जाहीर केले आहे. सर्व समाजाने आपली शेतीतील कामे आटपून आंतरवाली सराटीकडे येण्याचं आवाहन पाटलांनी केले .

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Beed: सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करणाऱ्या जरांगेंनी पुन्हा एकदा लढण्यासाठी मराठा समाजाला आवाहन केले आहे. मागच्या वर्षी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी उपोषण करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर जरांगे पाटील चर्चेत आले होते.

“निवडणूक संपली… सरकार स्थापन होईल. आता मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारायचा..” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधून केले आहे. मराठा समाजाने आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी तयारीला लागा असा आदेश देखील पाटलांनी मराठा समाजाला दिलाय.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकार स्थापन होताच पुन्हा आंतरवली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक उपोषण करणार असल्याचं जाहीर केले आहे. सर्व समाजाने आपली शेतीतील कामे आटपून आंतरवाली सराटीकडे येण्याचं आवाहन पाटलांनी केले . जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही. तोपर्यंत आंदोलन आणि उपोषणावर ठाम असणार असल्याचं देखील पाटलांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. केवळ एका जातीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येणार नाही,हे लक्षात आल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. निवडणुकीसाठी ज्या ज्या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले होते त्या सगळ्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते.”उमेदवार मागं घेणं हा माझा वैयक्तिक निर्णय होता” अशी महिती त्यांनी त्यावेळी दिली होती.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथून उपोषणाला सुरुवात केली होती.त्यानंतर बघता बघता त्यांच्या उपोषणाचं रूपांतर आंदोलनात झालं. असंख्य मराठा बांधव यावेळी आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी एकवटले गेले होते. निवडणुकीपूर्वी काही काळ हे आंदोलन थांबवण्यात आलं होतं.परंतु आता पुन्हा एकदा मनोज जरांगेनी उपोषणाचा इशारा दिला आहे. सरकार कोणाचंही असो…आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहोत असे जारांगे म्हणाले.

Source link

hunger strikeMaharashtra politicsprotestvidhansabha electionwarringमनोज जरांगे पाटील उपोषणमरामराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चाविधानसभा निवडणुक निकाल
Comments (0)
Add Comment