Mumbai Water Supply Cut: लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात असलेल्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे.
रहिवाशांना गुरुवारी आणि शुक्रवारी या कामाचा फटका बसणार आहे. लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात असलेल्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. हे काम महापालिका गुरुवार, २८ नोव्हेंबरला रात्री दहा वाजल्यापासून सुरू करणार असून शुक्रवारी रात्री आठ वाजता पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
या कामासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे जी-दक्षिण आणि जी-उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल. यात करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग, संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग,
पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्ण वेळ बंद राहणार आहे. एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग या भागांमध्ये पाणीपुरवठा अंशतः सुरू राहील.