Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. बडगुजर यांना एकूण केंद्राच्या ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करण्याची अनुमती आहे.
हायलाइट्स:
- उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा
- महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघामध्ये फेर मतमोजणी
- नाशिक पश्चिममध्ये चित्र पालटणार?
सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. बडगुजर यांना एकूण केंद्राच्या ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करण्याची अनुमती आहे. फेर मतमोजणीला एकूण खर्च सांगायचा झाला तर, बडगुजर यांना प्रति युनिट ४० हजार आणि १८ टक्के जीएसटी भरुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५ टक्के केंद्रांची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकार तथा जिल्हाधिकाी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना सूचना पत्र दिलं आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात एकूण दोन लाख ७४ हजार २०८ मतदान झाले होते. यामध्ये १ लाख ४७ हजार ३८२ पुरुष आणि १ लाख २६ हजार ८२३ महिलांसह तीन तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला. दोन हजार ३१३ मतदारांनी टपाली मतदान केले होता. शनिवारी मतमोजणीदरम्यान हिरे, बडगुजर आणि पाटील यापैकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याची उत्कंठा वाढली होती. पहिल्या फेरीपासूनच हिरे यांनी मतांमध्ये घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली. शेवटच्या तिसाव्या फेरीअखेर त्यांनी ६८ हजार १७७ चे मताधिक्य घेत विजय