केंद्रात मंत्रिपद नको, ऑफर नाकारली; शिंदेंची खासदार लेकासाठी मोठी मागणी, भाजप बुचकळ्यात

Eknath Shinde Demand To Mahayuti: राज्यात विधानसभा निवडणुका पार पडला. यामध्ये महायुतीने घसघशीत यश मिळवलं. पण, अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीत एकमत झाल्याचं दिसत नाहीये. त्यातच, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडावा लागणार असल्याचं चित्र आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकांचे जे निकाल समोर आले आहेत त्यामध्ये महायुतीला प्रचंड मोठा विजय प्राप्त झाला आहे. या विजयानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती एकाच गोष्टीची की राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? निवडणुकीचा निकाल लागून आता चार दिवस झाले आहेत, तरी महायुतीतीला मुख्यमंत्रिपद कोणाला द्यायचं हा पेच सोडवता आलेला नाही. भाजपच्या नेत्यांनी त्यांचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली, तर शिवेसेनेच्या नेत्यांमधूनही एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदावर विराजमान व्हावे असा सूर उमटू लागला होता.

भाजपसमोर शिंदेंचा दबाव कमी पडला

सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचंही दिसून आलं. पण, १३७ इतक्या जागा जिंकलेल्या भाजपवर शिंदेंच्या दबावाचा काहीही फरक पडला नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश भाजपने सेनेला दिला. त्यानंतर आता शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. पण, त्यासोबतच त्यांनी भाजपसमोर एक अटही घातली आहे. त्यामुळे भाजपसमोर आता पुन्हा एकदा मोठा पेच निर्माण झाला आहे.

भाजपकडून शिंदेंना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या बदल्यात मोठ्या पदाची ऑफर

भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या बदल्यात केंद्रात महत्त्वाचं मंत्रिपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रिपद देण्याची ऑफर दिली. पण, आता शिंदेंनी या दोन्ही ऑफर्स नाकारत भाजपसोमोर गुगली टाकली. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर महायुतीचं संयोजन पद द्यावं, अशी मागणी शिंदेंनी केली आहे. त्याशिवाय, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद मिळाले, असंही ते म्हाणाले. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या या मागणीने भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण, यामुळे भाजप महायुतीतील सारी गणितं बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या भाजप आणि महायुतीने या प्रस्तावावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला विलंब होत असल्याचं दिसत आहे.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

deputy chief minister shrikant shindeDevendra Fadnaviseknath shinde newsएकनाथ शिंदेमहायुती मुख्यमंत्री कोण होणार?श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री
Comments (0)
Add Comment