Baba Vanga Prediction 2025 : लवकरच 2025 वर्ष सुरू होईल, आपण सगळेजण नवीन वर्षाची वाट पाहत आहोत. जेव्हा नवीन वर्ष येते तेव्हा काय काय होणार याबदद्ल जाणून घेण्याची उत्सूकता सगळ्यांना असते. खास करून बाबा वेंगा यांची नवीन वर्षाबद्दलची भविष्यवाणी काय सांगते ते जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सूक असाल. चला तर जाणून घेवूया 2025 बद्दल बाबा वेंगा यांनी काय भविष्यवाणी केलेली आहे.
2025 बद्दल बाबा वेंगांची भयानक भविष्यवाणी
2025 वर्षाबद्दल बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या सगळ्यांचे टेन्शन वाढविणार आहे. बाबा वेंगा यांच्या मते, 2025 पासून अंतिम काळाची सुरुवात होणार आहे. 2025 मध्ये युरोपमध्ये एक भयंकर युद्ध सुरू होऊ शकते, ज्यामुळे मोठी आपत्ती येईल आणि त्यात जिवीतहानी सह मालमत्तेची हानी होऊ शकते.
2025 पासून सर्वनाशाला सुरुवात
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, युरोपमधील युद्धामुळे संपूर्ण खंड नष्ट होऊ शकतो. हे युद्ध युरोपला संपूर्णपणे नष्ट करू शकते. या युद्धामुळे केवळ आर्थिक हानीच नाही, तर सामाजिक स्तरावरही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्याचा दीर्घकाळ परिणाम राहू शकतो. वेंगा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विजयाबद्दलही वक्तव्य केलेले आहे. सर्व काही बर्फासारखे वितळून जाईल, फक्त एकच अपवाद असेल, व्लादिमीरचा गौरव, रशियाचा गौरव, या युद्धामुळे जागतिक पातळीवर सर्वनाश होण्याची शक्यता आहे.
2043 मध्ये मुस्लिम शासन येणार का?
बाबा वेंगा यांची एक आणखी भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. बाबा वेंगा यांच्या मते, 2043 मध्ये युरोपमध्ये मुस्लिम प्रशासन असेल. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, त्या काळात भू-राजनीतिक बदल देखील पाहायला मिळू शकतात. 2076 पर्यंत संपूर्ण जगात कम्युनिस्ट प्रशासनाच्या पुनरागमनाची शक्यता असेल, असे ही बाबा वेंगा यांनी सांगितले आहे.
किती वेळा बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरली?
बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाणी केलेल्या आहेत, ज्या आत्तापर्यंत खऱ्या ठरलेल्या आहेत. स्टॅलिनची मृत्यू, सोविएत संघाचे विभाजन, दुसरे महायुद्ध किंवा 2004 मधील त्सुनामी- सूनामीसह अनेक घटना बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार घडलेल्या आहेत.
बाबा वेंगा कोण आहेत?
बाबा वेंगा यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्टेरोवा होते. वयाच्या 12 वर्षी त्यांना अंधत्व आले. या घटनेनंतर त्यांच्यात एक विशेष शक्ती विकसित झाली, ज्यामुळे ते भविष्यातील घटनांची भविष्यवाणी करू शकत होते. त्यांनी आपले जीवन बुल्गारियामध्ये व्यतीत केले. तसेच स्वतःच्या मृत्यूची ही भविष्यवाणी केली होती. त्यांच्या निधनापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्यांचे निधन 11 ऑगस्ट 1996 रोजी होईल, आणि अगदी त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. असं सांगितले जाते की, आजही त्यांची भविष्यवाणी खरी ठरते.