शिंदेंची माघार, आता दादांची मोठी मागणी; NCP प्रचंड आग्रही, नव्या चेहऱ्यांची लागणार वर्णी

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगानं सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगानं सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे. भाजप नेतृत्त्वाचा निर्णय आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी मागणी करण्यात आली आहे. नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीला एकूण १२ मंत्रिपदं हवी आहेत. त्यासाठी अजित पवारांचा पक्ष आग्रही आहे.

महायुती सरकार २.० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं हवी आहेत. गेल्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री होते. ते सगळेच कॅबिनेट मंत्री होते. मागील सरकारमध्ये असलेला कॅबिनेट मंत्रिपदांचा आकडा कायम राहावा. त्यासोबत ३ राज्यमंत्रिपदं मिळावीत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. सत्ता स्थापनेबद्दल चर्चा करण्यासाठी उद्या दिल्लीत महायुतीची महत्त्वाची बैठक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
ते ‘पुन्हा येणार’! फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी कोणत्या अटींसह CMपदावरील दावा सोडला?
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नेते होते. त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदं होती. त्यातील दोघांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जागी दोन नव्या आमदारांना संधी मिळेल. राष्ट्रवादीला ३ राज्यमंत्रिपदं हवी आहेत. या मंत्रिपदांवर तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहेत. गेल्या मंत्रिमंडळातील ७ चेहऱ्यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा संधी दिली जाणार आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ जण असतात. हा कमाल आकडा आहे. गेल्या मंत्रिमंडळात केवळ २८ मंत्री होते. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रसचे प्रत्येकी ९ जण होते. अजित पवारांची महायुतीत एन्ट्री झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजित पवारांसह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही. त्यामुळे १५ मंत्रिपदं अखेरपर्यंत रिक्त राहिली. त्यामुळे अनेक मंत्र्यांकडे अनेक मंत्रालयांची जबाबदारी होती.
महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार?
आता नव्या सरकारमध्ये भाजपला २१, शिवसेनेला १२ आणि राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राष्ट्रवादीनं १२ मंत्रिपदांची मागणी केली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदारील दावा सोडला आहे. त्यामुळे शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. गृह विभागासाठी शिवसेना आग्रही आहे. गेल्या सरकारमध्ये गृह विभाग देवेंद्र फडणवीसांकडे होता.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Maharashtra politicsncpshiv senaअजित पवारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसभाजपमहायुती सरकारमहाराष्ट्र राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment