महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार?

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरश: पानीपत झालं. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरश: पानीपत झालं. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत. या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. त्यात बहुतांश जणांनी स्वबळाचा सूर आळवला. त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या काळात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

आगामी निवडणुका पक्षानं महाविकास आघाडीतून न लढता स्वबळावर लढवाव्यात, असा सूर शिवसेना उबाठामध्ये आहे. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत बहुतांश पराभूत उमेदवारांनी, नेत्यांनी एकला चलो रेचा सूर आळवला. ठाकरेंकडे अनेकांनी तशी इच्छा व्यक्त केल्याची कबुली शिवसेना उबाठाचे नेते, विधान परिषदेतील उपनेते अंबादान दानवे यांनीदेखील या सगळ्याला दुजोरा दिला.
मी काहीही ताणून धरलेलं नाही! अखेर शिंदेंनी मौन सोडले; मुख्यमंत्रिपदावरही स्पष्टच बोलले
‘पक्षात अनेकांचा स्वबळाचा सूर आहे आणि आम्ही ते अजिबात नाकारत नाही. शिवसेनेनं स्वतंत्रपणे लढलं पाहिजे, असं बऱ्याच जणांना वाटतं. शिवसेना काही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. सत्ता शिवसेनेला कधी ना कधी मिळेलच. शिवसेना एका विचारानं काम करणारी संघटना आहे. बऱ्याच जणांनी तो विचार मांडला. शिवसेनेनं सगळ्या निवडणुकांमध्ये आपलं स्वतंत्र संघटन उभं करुन निवडणूक लढली पाहिजे,’ असं दानवेंनी सांगितलं.

शिवसेना उबाठामध्ये स्वबळाचा सूर लावला जात असताना आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘जशी त्यांची स्वबळाची इच्छा आहे, तशी आमचीही इच्छा होती. हा इच्छेचा विषय नाही. आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि निकालानंतर त्यांनी काय करायचं तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आमची भूमिका आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्हीही मांडू. पण आम्ही काही इतक्या घाईनं भूमिका मांडणार नाही. हायकमांडशी चर्चा करु. त्यानंतर भूमिका घेतली जाईल,’ असं वडेट्टीवार म्हणाले.
Eknath Shinde: भाजपनं ‘तेव्हा’च शिंदेंना पुन्हा CM करण्याचा शब्द दिलेला! सेना नेत्याचा खळबळजनक दावा
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मविआला केवळ ४६ जागा मिळाल्या. शिवसेना उबाठानं २०, काँग्रेसनं १६, राष्ट्रवादी शपनं १० जागा जिंकल्या. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळावं, इतक्याही जागा मिळालेल्या नाहीत. विरोधी पक्षासाठी विधानसभेत किमान २९ सदस्य असावे लागतात. त्यापासून तिन्ही पक्ष दूर आहेत.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maha vikas aghadiMaharashtra Political Newsshiv sena ubtUddhav Thackerayउद्धव ठाकरेकाँग्रेसमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाविकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Comments (0)
Add Comment