बंडखोरांची घरवापसी नकोच! भाजप निष्ठावंतांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा; पक्षाकडे अहवाल

बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्यास सामूहिक राजीनामे देऊ, असा इशाराच भाजपच्या निष्ठावंतांनी प्रदेशाध्यक्षांना दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स
bjp flag new

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : विधानसभा निवडणुकीत आपल्याच उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या भाजममधील बंडखोरांनी आता परतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यांच्या घरवापसीला निष्ठावंतांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्यास सामूहिक राजीनामे देऊ, असा इशाराच भाजपच्या निष्ठावंतांनी प्रदेशाध्यक्षांना दिला आहे.

पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी या बंडखोरांनी सुरू केल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर आमचा त्यांना विरोधच राहील, असे निष्ठावंतांनी स्पष्ट केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच माजी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना बंडखोरांचा अहवाल दिला जाणार आहे. त्यात विरोधी भूमिका घेणाऱ्या काही ज्येष्ठ माजी नगरसेवकांचादेखील समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील तीन मतदारसंघांसह चांदवड आणि बागलाणमध्ये भाजपत बंडखोरी झाली होती. भाजपच्या सर्वाधिक नाराजांनी आपल्याच उमेदवारांविरोधात अर्ज दाखल करून भाजपच्याच उमेदवारांना जेरीस आणले होते.माजी नगरसेवक गणेश गितेंसह कमलेश बोडके, दिनकर पाटील यांच्यासह १६ जणांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली.
लाचखोरीत नाशिक ‘अव्वल’! विभागामध्ये १३२ सापळे, ५५ लाखांची लाचखोरी; १८७ जणांवर गुन्हे दाखल
नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरेंविरोधात माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी बंडखोरी करीत ‘मनसे’ कडून उमेदवारी केली. चांदवडमध्ये आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याविरोधात केदा आहेर यांनी बंडखोरी केली, तर जयश्री गरुड यांनी बालगाणमध्ये दिलीप बोरसे यांच्याविरोधात बंडखोरी केली. यासोबतच इंदुमती नागरे, पल्लवी पाटील, मुधकर हिंगमिरे, रवींद्र धिवरे यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यामुळे पक्षाने सात माजी नगरसेवकांसह १६ जणावंर हकालपट्टीची कारवाई केली होती. परंतु, आता निवडणूक संपल्यानंतर राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे पाहून या बंडखोरांपैकी काहींनी पुन्हा भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन परत येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असून, निष्ठावंतांनी आता थेट सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिला आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच; तीनही घटकपक्षांचा दावा, वरिष्ठांकडे पदासाठी लॉबिंग
बंडखोरी करून भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम करणाऱ्यांना पक्षात घेण्यास माझा विरोध राहणार आहे. बंडखोरांना पक्षात परत घेतले, तर मी राजीनामा देईन. – अॅड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व

बंडखोरांनी आपल्याच उमेदवारांना अडचणीत आणल्यामुळे त्यांना परत पक्षात घेऊ नये अशी आमची भूमिका आहे. पक्षाचे नुकसान होऊ नये अशी भूमिका आम्ही वरिष्ठांकडे मांडू. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाईल. – प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

BJP In Maharashtradilip borsenashik bjpnashik vidhan sabha election resultsprashant jadhavrahul dhikaleseema hirayनाशिक बातम्यामराठी बातम्याराजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment