Papaya Trees Vastu Info: फळ झाडं लावण्याची हौस अनेकांना आहे. त्यातील काही झाडं सकारात्मक ऊर्जे सह सुख समृद्धी देतात पण काही झाडं नकारात्मकता वाढवतात. अनेक घरासमोर किंवा अंगणात आपण पपईचे झाड पाहतो. पपईचे झाडं घरासमोर असणे शुभ की अशुभ? याबद्दल माहिती घेवूया.
घराच्या समोर पपईचे झाड शुभ की अशुभ?
वास्तुशास्त्रानुसार, पपईचे झाड घराच्या समोर कधीही लावू नये. समजा हे पपईचे झाड आपोआप उगवले तर ते झाड मोठे होण्याआधीच दुसऱ्या ठिकाणी लावले पाहिजे. शक्यतो पपईच्या झाडाची जागा घरासमोर नसावी. असे म्हणतात जर घरासमोर पपईचे झाड असेल तर आर्थिक स्थीतीत सुधारणा होत नाही. येणारा पैसा देखील थांबतो. घरात सुखशांती, समाधान राहत नाही. म्हणून शक्यतो घरासमोर पपईचे झाड लावू नये. समजा पपईचे झाडं घरासमोर असेल तर झाडाच्या खोडात थोडा हिंग भरावा म्हणजे वास्तूदोष थोड्याप्रमाणात कमी होतो.
पपईच्या झाडात पितरांचा निवास
ज्योतिषशास्त्रानुसार, पपईच्या झाडात पितरांचा निवास असतो असे मानतात. म्हणूनच पपईचे झाडं घरासमोर नसावे. घरासमोर पपईचे झाड असेल तर मुलांना प्रत्येक गोष्टीत अपार कष्टाचा सामना करावा लागतो.
घराच्या अंगणात पपईचे झाड नको
घराच्या अंगणात पपईचे झाड लावत असाल तर ते अशुभ मानले जाते. अंगणात पपईचे झाड असेल तर आर्थिक समस्या कायम राहते. घरात कायम क्लेश होत राहतो. वादविवाद आणि कलह यामुळे टेन्शन वाढू शकते. म्हणून शक्यतो घराच्या अंगणात पपईचे झाड लावू नये. या सर्व कारणांमुळे घरासमोर पपईचे झाड असणे वास्तूशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.