Pune Crime News: पुणे जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण मडीखांबेसह त्याच्या ७ साथीदारांना जून महिन्यात तडीपार करण्यात आले होते.
हायलाइट्स:
लोणी काळभोर मधील मोक्यातील इंधन माफिया गजाआड
मागील दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता
आयुक्त कार्यालयातील पोलीस पथकाने शिताफीने अटक केली
दिंगबर माने, पुणे : पुण्यातील लोणी काळभोर येथील अधिकृत कंपनीतील इंधन टँकरचे जीपीएस हॅक करून चोरी विक्री करणारा इंधन माफियाला पोलिसांनी गजाआड केले. पेट्रोल डिझेलची विक्री करणारा मुख्य सराईत आरोपी मागील दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता, अखेर पुण्यात वकिलाला भेटायला आलेल्या आरोपीला सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस पथकाने शिताफीने अटक केली.प्रवीण सिद्राम मडीखांबे (वय ५० रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर ता. हवेली, जि.पुणे ) असे असे इंधन चोरीचा मुख्य आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन महिन्यापूर्वी लोणी काळभोर हद्दीतील कुंजीरवाडी येथे इंधन चोरी करत असताना छापा टाकून १२ आरोपीला अटक केली होती. या इंधन माफिया टोळीचा मुख्य सूत्रधार प्रवीण मडीखांबे याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तो सोलापूरला राहत होता. त्या ठिकाणाहून पेट्रोल डिझेलच्या चोरी बाबत तो सूत्र हलवत होता. हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर व लोणी काळभोर पोलीस सोलापूर व महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये मोबाईलच्या तांत्रिक लोकेशन द्वारे त्याचा पाठलाग करत होते. मात्र तो पोलिसांना चकवा देत होता. हा ‘ चोर पोलिसांचा खेळ ‘ दोन महिन्यापासून चालू होता. अखेर बुधवारी आरोपी प्रवीण मडीखांबे हा पुण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर व हवालदार मल्हारी ढमढेरे व इतर पोलिसांनी सापळा रचून पुणे कॅम्प अरोरा टावर येथून त्याला अलगद गजाआड केले. आज त्याला न्यायालयात हजर करणार आहेत. Mahayuti CM: मुख्यमंत्रिपदी कोण? चर्चांना लवकरच उत्तर मिळेल, फडणवीसांचं वक्तव्य, अजितदादांचेही मोठे संकेत
पुणे जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण मडीखांबेसह त्याच्या ७ साथीदारांना जून महिन्यात तडीपार करण्यात आले होते. त्यामुळे इंधन चोरीला आता तरी आळा बसेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, त्याच्याच मार्गदर्शनाखाली चोरलेले इंधन काळ्या बाजाराने विक्री केली जात होती. मुख्य सूत्रधारालाच पोलिसांनी अटक केल्याने इंधन चोरी आता थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करणकोट यांनी सांगितले की, डिझेल व पेट्रोल चोरी मधील सराईत गुन्हेगार मडीखांबे हा दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता. लोणी काळभोर पोलीस व मुंढवा पोलीस चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे त्याचा दोन महिन्यापासून शोध घेत होते. अखेर बुधवारी पुणे कॅम्प येथे आरोपी वकिला भेटायला आले असता सापळा रचून गजाआड केले.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा