What does it mean when a bird flies towards you : स्वप्नाचे जग हे थोडे विचित्र असते. आपण झोपेत असून तेव्हा आपल्या डोक्यात किंवा स्वप्नात काय दिसेल याचा नेमका अंदाज बांधता येत नाही. अनेकदा आपण अशी काही स्वप्न पाहातो. जी आपल्याला आनंद देतात, ज्यामुळे ती नेहमी खरी व्हावी असे देखील वाटते. परंतु, काही स्वप्न असे देखील असतात, ज्याचा विचार करुन आपला संपूर्ण दिवस खराब जातो. जर तुम्ही स्वप्नात ५ वेगवेगळे पक्षी पाहिले तर नेमके त्याचे कारण काय जाणून घेऊया स्वप्नशास्त्रातून
आपण दिवसभरात जो विचार करतो तेच आपल्याला रात्री स्वप्नात बरेचदा दिसू लागते. त्यामुळे कायम सकारात्मक विचार करण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. नकारात्मक गोष्टींचा विचार केला तर आपण नैराश्यात जाण्याची शक्यता अधिक असते.
स्वप्नाचे जग हे थोडे विचित्र असते. आपण झोपेत असून तेव्हा आपल्या डोक्यात किंवा स्वप्नात काय दिसेल याचा नेमका अंदाज बांधता येत नाही. अनेकदा आपण अशी काही स्वप्न पाहातो. जी आपल्याला आनंद देतात, ज्यामुळे ती नेहमी खरी व्हावी असे देखील वाटते. परंतु, काही स्वप्न असे देखील असतात, ज्याचा विचार करुन आपला संपूर्ण दिवस खराब जातो. जर तुम्ही स्वप्नात ५ वेगवेगळे पक्षी पाहिले तर नेमके त्याचे कारण काय जाणून घेऊया स्वप्नशास्त्रातून
घुबड
स्वप्नात घुबड दिसणे ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानले जाते. हे देवी लक्ष्मीचे वाहन आहे. स्वप्नात घुबड दिसल्याने आपल्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता अधिक असते. तसेच करिअर क्षेत्रात मोठे बदल घडतात.
नीलंकठ
नीलंकठ हा पक्षी भगवान शंकराचा प्रतीक मानला जातो. या पक्षाचे स्वप्नात दिसणे अविवाहितांसाठी चांगले ठरते. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा अधिक वाढू शकते.
मोर
ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्नात मोर पाहणे म्हणजे जीवनात आनंद आणि समृद्धी येण्याचे लक्षण मानले जाते. जर तुम्ही स्वप्नात पांढऱ्या रंगाचा मोर पाहिला तर तुमच्यासाठी तो फार लकी ठरु शकतो. याचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी कराल.
हंस
स्वप्नात हंस पोहताना पाहणे, हंसांची जोडी पाहणे किंवा त्यांना धान्य खाऊ घालताना पाहणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, याप्ररकारचे स्वप्न पाहणे शुभ कार्याची सुरुवात दर्शवते. स्वप्नात मृत किंवा काळा हंस पाहणे अशुभ मानले जाते.
पोपट
स्वप्नात पोपट दिसणे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पोपट दिसणे घरात नवीन पाहुणे येण्याचे आगमन असते. वैवाहिक जीवनातील सौहार्दपूर्ण संबंध दृढ होण्याचाही हा पुरावा आहे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.