उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार?

दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: सत्ता स्थापनेबद्दल, मुख्यमंत्रिपदाविषयी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी तो अंतिम असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी काल मांडली. दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपनं उपमुख्यमंत्रिपद दिल्यास ते स्वीकारा, अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंनी घातली.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजपच्या नेतृत्त्वावर सोपवला आहे. शिंदे उपमुख्यमंत्रिपद होण्यास फारसे उत्सुक नाहीत. सत्तेबाहेर राहून पक्ष सांभाळायचा असा विचार त्यांच्याकडून सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे सत्तेत सहभागी न होता पक्ष चालवायचा असा त्यांचा मानस आहे. पण शिंदेंनी सत्तेत सहभागी व्हावं, असा शिवसेनेच्या आमदारांचा, माजी मंत्र्यांचा आग्रह आहे.

एकनाथ शिंदेंनी काल त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही सरकारमध्ये या, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारा, अशी मागणी त्यांनी शिंदे यांच्याकडे केली. सत्तेबाहेर राहून नव्हे, तर सत्तेत सहभागी होऊन सरकार चालवा, असा आग्रह नेत्यांनी शिंदेंकडे धरला. माजी मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, आमदार संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी शिंदेंशी चर्चा केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले आहेत. ते दिल्लीला जाण्यापूर्वीही शिवसेनेचे नेते त्यांच्या भेटीला पोहोचले. ‘तुम्ही आमचे सर्वोच्च नेते आहेत. तुम्ही आम्हाला सत्तेत हवे आहात. केवळ पक्षप्रमुख म्हणून काम न करता तुम्ही सत्तेत सहभागी व्हा. उपमुख्यमंत्रिपद मिळत असल्यास ते स्वीकारा. सरकारमध्ये चांगल्या पदावर काम करा. तुम्ही मंत्रिमंडळात असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे,’ अशी भूमिका नेत्यांनी शिंदेंकडे मांडली.

शिवसेनेच्या नेत्यांच्या आग्रही मागणीबद्दल एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. त्यामुळे ते नव्या मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्रिपद सोडणारे शिंदे महत्त्वाच्या खात्यांसह महायुती २.० सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या दिल्लीतील बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Dada BhuseMaharashtra Political NewsMaharashtra politicsShambhuraj Desaiउपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदेगुलाबराव पाटीलप्रताप सरनाईकभाजपशिवसेना
Comments (0)
Add Comment