विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतरही सत्तास्थापनेवरून हालचालींचा वेग मंदावला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा रस्ता मोकळा झाला आहे. दरम्यान या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांना मुख्यमंत्रिपद दिलं तर मी स्वतः जाऊन अभिनंदन करेन.पार्टी म्हणून नाही तर माझे काका म्हणून मी त्यांना शुभेच्छा देईल, असं वक्तव्य त्यांनी केलं. दादांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात केलेल्या प्रश्नावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.