Sindhudurg Crime News : सिंधुदुर्गात मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येने खळबळ उडाली आहे. मुंबईतून गावी गेलेल्या पोलिसाची हत्या केलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या हत्येप्रकरणी प्रकरणी पोलिसांनी संशयित व्यक्ती सिद्धिविनायक संजय पेडणेकर या २२ वर्षीय तरुणाची चौकशी करुन अवघ्या काही तासातंच मुसक्या आवळल्या आहेत. सिंधुदुर्ग पोलिसांना या हत्येचा मोठा तपास करण्यात काही तासातंच यश आलं आहे. कणकवली तालुक्यात नांदगाव कोळोशी येथील गावी आलेले विनोद मधूकर आचरेकर (वय ५५ ) यांची कुदळाचा वापर करून निर्दयीपणे हत्या करण्यात आला आहे.
मुंबई पोलीस दलातून निवृत्ती घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे अवघा सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव कोळोशी वरची वाडी येथील मुंबई येथील विनोद मधूकर आचरेकर (वय ५५ ) यांची राहत्या घरात कुदळाचा वापर करून हत्या करण्यात आली आहे.
हत्या केल्यानंतर संशयित पेडणेकर यानेच १०० नंबर १०९ या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर फोन करुन माझ्या काकांची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची माहिती दिली होती. आरोपी पेडणेकर आणि निवृत्त पोलीस आचरेकर हे दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केल्यावर त्यांनी हे कृत्य केल्याचं कबूल केलं आहे. संशयित आरोपी पेडणेकर याने कुदळाचा वापर करून अत्यंत निर्दयीपणे हा खून केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
आदल्या दिवशी दारू पार्टी करताना झालेल्या वादातूनच ही हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. यावेळी आदल्या दिवशी रात्री केलेल्या पार्टीचे पुरावे घटनास्थळी पोलिसांना सापडले. फॉरेन्सिक लॅब, श्वानपथक या तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावरून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.
मुंबईतील निवृत्त पोलिसाचा राहत्या घरात मृतदेह, पुतण्याचा बनाव फसला; सिंधुदुर्गातील घटनेने खळबळ, काय घडलं?
विनोद आचरेकर यांनी मुंबई पोलीस दलातून निवृत्ती घेतली होती. मुंबई मरोळ येथील १९८९ च्या बॅचचे ते निवृत्त कर्मचारी होते. आचरेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई असं कुटुंब आहे. मुंबई भांडुप परिसरात ते वास्तव्यास आहेत. आचरेकर गावी घरच्या साफसफाईसाठी आले होते. मात्र त्यांची दुर्देवी हत्या झाली. आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.