भाजपच्या माजी मंत्र्याचीच फेर मतमोजणीची मागणी, ८ लाखही भरले, बैलाने चिुमकल्याला फरफटत नेले, शौर्यचा मृत्यू, सारे हळहळले

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यभरातून इव्हीएमवर शंका घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी याविरोधात अधिकृतपणे अर्ज करून पडताळणी करून घेण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात भाजपचे कर्जत-जामखेडमधील उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे इव्हीएम विरोधात सोशल मीडियातून आवाज उठविण्यात आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातही इव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे. बातमी वाचा सविस्तर…
२. महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली हायव्होल्टेज बैठक काल रात्री राजधानी दिल्लीमध्ये उशिरा पार पडली. भाजप श्रेष्ठी अमित शाह यांनी महाराष्ट्रातील महायुतीचे तीन शिलेदार देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम फैसला झाल्याची माहिती आहे, परंतु त्याबाबतची घोषणा मुंबईतून होणार आहे. अडीच तास चाललेल्या कालच्या बैठकीत मंत्रिमंडळ खातेवाटपावरही चर्चा झाली. बैठकीनंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी ‘काळजी’ बैठकीचं सार सांगून जाते.

३. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ‘पराभवाने खचून जाऊ नका,’ असे सांगत त्यांना धीरदेखील दिला. ठाणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ८२ उमेदवार, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि अन्य प्रमुख पदाधिकारी गुरुवारी पुण्यात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित होते. मतदान, मतमोजणी प्रक्रियेबाबत तक्रारी असतील, तर त्या लेखी द्याव्यात, असे आदेश ठाकरे यांनी या वेळी उमेदवारांना केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि मतदान झाल्यानंतरही मनसेला पाच ते आठ जागांचा अंदाज होता, पण तुमच्या सभा होण्याची गरज होती, असे बहुसंंख्य उमेदवारांनी सांगितले. बातमी वाचा सविस्तर…

४. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाच दिवस उलटल्यावरही अद्याप राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही. याबाबत आता थेट दिल्लीदरबारी भाजप पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री बैठक झाली. यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजधानीत दाखल झाले. यामध्ये काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपचा निर्णय मला मान्य असेल, अशी भूमिका जाहीर केल्यावरही उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायचे की नाही, याबाबत शिंदे संभ्रमात आहेत.

५. ‘राज्यात दोन डिसेंबरच्या सुमारास नवे सरकार स्थापन होईल,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी दिल्ली येथे स्पष्ट केले. त्याच वेळी ‘आगामी सरकारमध्ये अर्थमंत्रिपद आपल्याकडेच येईल व सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम माझ्या नावावर जमा होईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

६. मुख्यमंत्रिपदासाठी महाराष्ट्राची पसंती देवेंद्र फडणवीस हे आहेत. मी आत्ताच सांगून ठेवतो, उलट सुलट राजकारण झाले तर एक हजार कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील व मी त्यातील एक असणार आहे, असा इशारा भाजपचे पदाधिकारी अवधूत वाघ यांनी एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरुवारी दिला.

७. राज्यातील शहरांच्या तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असताना शहरात गुरुवारी किमान १०.५ तर कमाल २७.४ तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडचा पारा गुरुवारी पहाटे अवघ्या ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

८. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणाऱ्या फुलगाव गावातून अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाच्या हातात बैलाला बांधलेली दोरी अडकली. नेमकं त्याचवेळी बैल पळत सुटल्याने त्या दोरीबरोबर मुलगा देखील फरपटत गेला. या घटनेत चिमुकला जखमी होऊन त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हवेली तालुक्यात शोककळा पसरली आहे. बातमी वाचा सविस्तर…

९. पाकिस्तानविरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिकी रंगली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा झिम्बाब्वेतील क्विन स्पोटर्स क्लब बुलवायो येथे रंगला. या मालिकेतील पहिला सामना ८० धावंनी जिंकला होता. कामरान गुलामच्या दमदार शतकाच्या जोरावर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा ९९ धावांनी पराभव केला.

१०. तुमच्या पगारातून PF कट होत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या पीएफ योगदानावर अधिक पेन्शन मिळण्याची संधी मिळू शकते. यासाठी कामगार मंत्रालय नियमात बदल करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार संघटित क्षेत्रातील सहा कोटी कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) सुधारणा करण्याच्या तयारीत असून ईपीएफओ सदस्यांसाठी अनेक नवीन फायदे जाहीर केले जाऊ शकतात.

Source link

maharashtra times top 10 headlinestoday highlightstoday latest newstop 10 headlinesआजच्या ठळक घडामोडीआजच्या ताज्या बातम्याटॉप १० हेडलाईन्समहाराष्ट्र टाइम्स टॉप १० हेडलाइन्स
Comments (0)
Add Comment