Ajit Pawar NCP Potential Minister Department: सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठकीला उपस्थित होते. यातच आता अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला राज्याच्या मंत्रीमंडळात कोणती खाती मिळणार याच्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादीला मिळणारी संभाव्य मंत्रीपद समोर आली आहेत. यामध्येच राष्ट्रवादी शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये मिळालेल्या त्यांच्या जुन्या खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. त्याप्रमाणेच ही यादी समोर आली आहे.
अजित पवार – उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
अनिल पाटील – आपात्कालीन
अदिती तटकरे – महिला व बालकल्याण
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
धनंजय मुंडे – कृषी खाते
संजय बनसोडे – क्रीडा खाते
यासोबतच यावेळीच्या मंत्रीमंडळात नरहरी झिरवाळ आणि धर्मरावबाबा अत्राम यांचीही नावे आहेत.