Karjat Jamkhed Ram Shinde Demands Recount of Votes: कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार प्रा. राम शंकर शिंदे यांनी इव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे.
हायलाइट्स:
- माजी मंत्र्यानीच केली फेर मतमोजणीची मागणी, शुल्कही भरले
- महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
- फेर मतमोजणीचा फायदा होणार?
जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे त्यांनी अर्ज केले आहेत. नियमानुसार त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी ४७ हजार २०० रुपये याप्रमाणे पाच केंद्राचे २ लाख ३६ हजार रुपये शुल्क भरले आहे. लंके यांनी १८ बुथवरील यंत्राची पडताळणीची मागणी केली असून त्यासाठी ८ लाख, ४९ हजार रुपयांचे शुल्क भरले आहे. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांनीही फेर मतमोजणीची मागणी केलीय आणि त्यांनी १४ बूथसाठी ६ लाख ६० हजार भरले आहेत. न्यायालयीन अपीलाची मुदत संपल्यानंतर म्हणजे ४५ दिवसांनंतर या पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राहुरी मतदारसंघात माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे असलेले प्राजक्त तनपुरे यांचा भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी ३४ हजार ७४५ मतांनी पराभव केला आहे. कर्डिले यांना १ लाख ३४ हजार ८८९ तर तनपुरे यांना १ लाख १४४ मते मिळाली आहेत. पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी २ हजार ४०६ मतांनी पराभव केला आहे. दाते यांना १ लाख १२ हजार ७७५ तर लंके यांना १ लाख १० हजार ३६९ मते मिळाली. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार १० हजार ६४५ मते मिळाली आहेत. कोपरगाव मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे संदीप वर्पे यांचा महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी १ लाख २४ हजार ६२४ मतांनी पराभव केला आहे. काळे यांना १ लाख ६१ हजार १४७ तर संदीप वर्पे यांना ३६ हजार ५२३ मते मिळाली आहेत.
आता यातील तिन्ही पराभूत उमेदवारांनी इव्हीएम पडताळणीसाठी रितसर अर्ज केला आहे. याच पक्षाचे नगर शहर मतदारसंघातील पराभूत उमेदवार अभिषेक कळमकर यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. मात्र, अशी मागणी करण्याचे धोरण पक्षीय पातळीवरच ठरल्याचे सांगण्यात येते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी देशातील आठ-दहा उमेदवारांनी असे पडताळणीचे अर्ज दाखल केले होते. अहिल्यानगरमधून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांनीही अर्ज केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितल्याने ही पडताळणी अद्याप झालेली नाही. न्यायालयातील याचिकेवरील निर्णयानंतर यासंबंधीची कार्यवाही होऊ शकते. मात्र, न्यायालयातील याचिकाही प्रलंबिध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी गैरमार्गाचा अवलंब करून निव़डणूक जिंकल्याचा आरोप करीत विखे यांनी या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.