‘शाही’भेटीत शिंदेंच्या ४ प्रमुख मागण्या; चौथ्या मागणीनं भाजपात खळबळ, सत्ता वाटपाचा पेच कायम

Eknath Shinde: आधी दोन दिवस मौन, मग मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडून दिल्लीत अमित शहांची भेट घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी मुंबईत परतल्यानंतर अचानक गावी जाण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: आधी दोन दिवस मौन, मग मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडून दिल्लीत अमित शहांची भेट घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी मुंबईत परतल्यानंतर अचानक गावी जाण्याचा निर्णय घेतला. सत्ता स्थापनेसाठी महायुतीची महत्त्वाची बैठक असताना शिंदे थेट गावी निघून गेले. संध्याकाळच्या सुमारास ते साताऱ्यातील त्यांच्या दरे गावात पोहोचले. यामुळे शिंदे नाराज आहेत का, अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

सत्ता स्थापनेसाठी भाजप नेतृत्त्व घेईल तो निर्णय मला आणि माझ्या शिवसेनेला मान्य असेल, असं शिंदे दोनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हणाले. माझ्याकडून कोणताही अडसर येणार नाही, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याची चर्चा झाली. यानंतर काल शिंदे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.
…आणि म्हणून शिंदे गेले गावाला! निघण्यापूर्वी आव्हाडांकडे ‘मन की बात’, वर्षावर काय घडलं आज?
मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर आहे. शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद व्हावं अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. काल झालेल्या बैठकीत शिंदेंनी अमित शहांसमोर त्यांच्या चार प्रमुख मागण्या ठेवल्या. शिवसेनेला कॅबिनेट, राज्यमंत्री अशी मिळून १२ मंत्रिपदं मिळावीत. विधान परिषदेचं सभापतीही शिवसेनेला मिळावं, अशा मागण्या शिंदेंनी शहांसमोर ठेवल्या. महायुती-१ सरकारमध्ये शिवसेनेकडे नऊ मंत्रिपदं होती. या सरकारच्या कालावधीत मंत्रिमंडळातील सदस्य संख्या २८ इतकी होती. ती कमाल ४३ इतकी ठेवता येते.
तीन दिवस लगबग, ‘वर्षा’वर लक्षवेधी हालचाली; अखेर त्यांना अश्रू अनावर, शिंदे निघताच ढसाढसा रडले
पालकमंत्रिपदांचं वाटप करताना शिवसेनेचा योग्य सन्मान राखला जावा. खाते वाटपात गृह, नगर विकास विभाग शिवसेनेला मिळावेत, अशाही मागण्या शिंदे यांच्याकडून करण्यात आलेल्या आहेत. नगर विकास खातं याआधी शिंदे यांच्याचकडे राहिलं आहे. पण गृह खातं फडणवीसांनी सांभाळलं आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत फडणवीस मुख्यमंत्री होते. तर २०२२ ते २०२४ या कालावधीत फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले. या दोन्ही कार्यकाळात त्यांनी गृह मंत्रालय स्वत:कडे ठेवलं. गृह मंत्रालय अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे भाजप हे खातं शिंदेंसाठी सोडण्याची शक्यता अतिशय कमी आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpMaharashtra politicsmahayutishiv senaअमित शहाउपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदेगृह मंत्रालयदेवेंद्र फडणवीसशिवसेना
Comments (0)
Add Comment