डॉक्टरकडून रुग्णालयात तरुणीचा विनयभंग, परळी शहर बंद, गुन्हा दाखल

बीडच्या परळी शहरात फिजिशियन डॉक्टर यशवंत देशमुख यांच्याकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे. तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून मोठ्या संख्येने जमाव परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर जमला होता. या घटनेनंतर लोकांमध्ये संताप बघायला मिळाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

परळी, दीपक जाधव : बीडच्या परळी शहरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. यानंतर वातावरण तापल्याचे बघायला मिळतंय. फिजिशियन डॉक्टरकडून एका तरुणीची छेड काढण्यात आल्याचा हैराण करणारा प्रकार पुढे आला. डॉक्टराकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीची छेड डॉक्टराने काढली. यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी थेट पोलिस स्टेशन गाठून डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला. तरुणीच्या नातेवाईकांसह मोठ्या संख्येने जमाव परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर जमला होता.

परळी शहरातील डॉक्टर यशवंत देशमुख यांचे जनरल फिजिशियन हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप तरुणीने केला. पीडित तरुणीला न्याय मिळावा. याकरिता मोठ्या संख्येने लोक पोलिस स्टेशनबाहेर जमले होते. यानंतर पोलिसांकडून डॉक्टर यशवंत देशमुखवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता याच पार्श्वभूमीवर आज परळी बंदची हाक देखील देण्यात आलीये.
मुंबईत मद्यधुंद अवस्थेत कारचालकाचा गोंधळ, पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, बॅरिकेड्स तोडले, काही वाहनांना धडकडॉक्टर यशवंत देशमुख यांच्या विरोधात कलम 74,75( 2) 79,3,1, नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज परळी बंदची हाक नागरिकांकडून देण्यात आली असून नागरिकांनी शांतता अबाधित ठेवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. या घटनेचा निषेध म्हणून आज परळी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

डॉक्टर यशवंत देशमुख यांच्या रूग्णालयात तरुणीची छेड काढण्याचा प्रकार कळताच लोकांना धक्का बसला. ही तरुणी डॉक्टरांकडून तपासणीसाठी गेली होती, तेव्हाच हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जातोय. मात्र, तरुणीची छेडछाडीबद्दल कळताच नागरिकांनी पोलिस स्टेशनकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली. शेवटी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

beed newsgeneral physician doctorडॉक्टरांवर गुन्हा दाखलतरुणीचा विनयभंगपरळी शहर बंद
Comments (0)
Add Comment