Cabinet Minister allocation : आगामी मंत्रिमंडळात गृह खाते आणि राष्ट्रवादीला आश्वासन दिलेले अर्थ खाते वगळता अन्य विभागांचे वाटप व इतरही बाबींवर तडजोडीला वाव असल्याचे अमित शहा यांनी नमूद केले.
Eknath Shinde : सगळ्या मागण्या ऐकू, पण चौघांना मंत्रिपद नाही म्हणजे नाही! भाजपची अट, शिवसेनेतून कुणाचा पत्ता कट?
आगामी मंत्रिमंडळात गृह खाते आणि राष्ट्रवादीला आश्वासन दिलेले अर्थ खाते वगळता अन्य विभागांचे वाटप व इतरही बाबींवर तडजोडीला वाव असल्याचे अमित शहा यांनी नमूद केले. मात्र राज्याचे पुढचे मुख्यमंत्री भाजपचेच होणार व तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय आहे, हे शहा यांनी स्पष्टपणे सांगितल्याची माहिती मिळते.
चौघांच्या मंत्रिपदाला विरोध
शिवसेनेच्या व्यवहार्य मागण्या मान्य होतील व अव्यवहार्य मागण्या भाजपला मान्य नाहीत. भाजपला जे यश मिळाले आहे, ते पाहता अशा मागण्या मान्य करण्याची गरज पक्षाला नाही, याची जाणीव बैठकीत पुन्हा करून देण्यात आल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे गृह खात्यासह १२ मंत्रिपदांची मागणी केली होती. मात्र ती अमान्य होतानाच, शिवसेनेच्या चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपने विरोध केल्याची माहिती ‘एबीपी माझा’ने दिली आहे.
Raj Thackeray : बंद दाराआड बैठक आणि राज ठाकरे हमसून हमसून रडू लागले; काय घडलेलं त्या दिवशी?
कोणाकोणाला आक्षेप?
शिवसेनेतील अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि संजय राठोड या चार नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे. या चारही मंत्र्यांच्या कारभारावर भाजप नाराज असल्याचे बोलले जाते.
गुरुवारी रात्री बैठक
अमित शहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, शिंदे व अजित पवार यांच्यातील बैठक गुरुवारी रात्री दहा वाजताच्या आसपास सुरू झाली ती पुढचे अडीच तास चालली. शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, शंभुराज देसाई, उदय सामंत, राहुल शेवाळे हेही नेते शहा यांच्या निवासस्थानी (बैठकीत नव्हे) उपस्थित असल्याचे सांगण्यात येते.
त्यानंतर शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी (पंडित पंत मार्ग) मध्यरात्री सुमारे दोनपर्यंत या नेत्यांचीही बैठक झाली. राज्यघटनेतील तरतुदींनुसार लवकरच राज्याला मुख्यमंत्री मिळेल, असेही शिवसेनेतर्फे सांगितले जात आहे. शिंदे यांनी आपली नाराजी बैठकीवेळच्या फोटोसेशनमधून चेहऱ्यावर दाखविली, हे सूचक मानले जाते.
शहा यांनी त्यांच्या पद्धतीनुसार शिंदे यांना स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या. महायुतीने महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून कार्यरत रहावे, भाजपच्या विधिमंडळ दलाची बैठक पुढील दिवसात होईल, त्यात सारे काही स्पष्ट होईल, असे शहा यांनी सांगितल्याचे समजते.