Sanjay Shirsath on Sanjay Raut: ”एकनाथ शिंदेंनी दिलेरपणाने आणि आत्मविश्वासाने सत्ता सोडलेली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोकं नाही. पोटात एक आणि ओठात एक आणणारी औलाद नाही”.
हायलाइट्स:
- एकनाथ शिंदेंनी दिलेरपणाने आणि आत्मविश्वासाने सत्ता सोडलेली आहे
- काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो
- आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोकं नाही
संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली त्यावर, शिरसाट म्हणाले की, ”मानसिक संतूलन कुणाचं बिघडलेलं आहे. हे निकालानंतर सगळ्यांना कळालेलं आहे. जे ओरडून सांगत होते की आमची सत्ता येणार… १६०-१७०…ते पूर्ण ६० सुद्धा गाठू शकले नाहीत. मानसिक संतूलन विरोधकांचां बिघडलेलं आहे. त्यामुळे त्यांचे जे इतर नेते आहेत, ते यावर एक शब्द बोलत नाही, त्यांना त्यांची चूक कळालेली आहे. परंतू, चारही घरचा पाऊणा, ज्याला माहिती नाही त्याचा नेता कोण? ज्याला फक्त शेपूट हलवून आपल्या मालकाची चाकरी करायचं माहितीय…तेच लोकं अशी टीका करु शकतात”.
”भाजपची मेहरबानी म्हणून मुख्यमंत्रीपद दिलं आणि नाराज मुख्यमंत्री अमावस्येला गेले, भाजपने ते पद का दिलं? कशामुळे दिलं? त्याची कल्पना त्यांनाही आहे. भाजपच्या दारात जाऊन तिथून कितीवेळा परत आले, त्यांची कल्पना देखील संजय राऊत यांना आहे. आम्ही जे मिळवलंय ते, स्वत:च्या कष्टावर आणि स्वत:च्या हिमतीवर मिळवलेलं आहे. एवढी ज्या नेत्यामध्ये आहे, त्या नेत्याने केलेला उठाव या देशाने पाहिलेला आहे. यांचं चालू होतं की, गद्दारांना जनता यांची जागा दाखवेल, पण गद्दारांना जनतेनं त्यांची जागा दाखवलेली आहे. हे शिवसेनेप्रमुखांच्या विचारांच्या विरोधात वागणाऱ्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. आम्ही ४० लोकांनी उठाव केला आणि आमचे ५७ आमदार विजयी झाले. जनतेनं आम्हाला स्विकारलं आणि यांना लाथा मारलेल्या आहेत. ‘गिरा तो भी टांग उपर’ अशी यांची नेहमीची भुमिका आहे”.
”दिल्लीला हे कितीवेळा फोन करायचे आणि सांगायचे शिंदेंना घेऊ नका, आम्ही येतो. कोणकोणत्या माध्यमांतून फोन केलेले आहे आणि कुणाकुणाला हाताशी धरलेलं आहे, याचे सर्व रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. यांना जेव्हा नाही सांगितलं तेव्हा यांची पोपटासारखी पोपटपंची सुरु झाली. आता ते भाजपकडे जाऊ शकतात ना कॉंग्रेसकडे जाऊ शकतात. ‘घर ना घाट का’ अशी यांची स्थिती झालेली आहे”, असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले आहेत.