बाबा आढावांनी उपोषण सोडलं; आता सत्तामेव जयते सुरू…उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

Baba Adhav Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलताना आता सत्यामेव जयते सुरू झालं असल्याचं म्हणत महायुतीवर निशाणा साधला आहे.

Baba Adhav : बाबा आढावांनी उपोषण सोडलं; आता सत्तामेव जयते सुरू…उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव मागील तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करत होते. त्यांच्या भेटीसाठी पुण्यात अजित पवार दाखल झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे, जयंत पाटील, संजय राऊत हे बाबा आढावांच्या भेटीसाठी दाखल झाले. यावेळी बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत पैशांच्या मोठ्या प्रमाणातील वापराविरोधात त्यांनी आंदोलन, उपोषण केलं होतं. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन पुढे घेऊन जावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित, त्यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली. एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं कोणाला वाटत असेल, तर वणवा पेटवायला एक ठिणकी कारणीभूत असते आणि ती ठिणगी आज पडलेली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी या आंदोलनावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

तुम्ही म्हातारपण स्वीकारायला तयार नाहीत, आजही तुम्ही आम्हाला प्रेरणा देता. माझं मत आहे प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी बाबा आढावांबद्दल दिली.

पुढे ते म्हणाले, ‘एक सरकारी ताफा आता इथून गेला. महत्त्वाचा मुद्दा हा की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हारलेले सुद्धा इथे येतोय. थोडक्यात या निकालावर ना हारलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे. जिंकले त्यांना धक्का आहे की आम्ही जिंकलो कसे आणि आम्ही हारलो आम्हाला धक्का बसला आहे की आम्ही हरलो कसे. याच कारण स्पष्ट आहे. जे आमच्याकडून वधवून घेतलं, सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालं आहे आणि त्याच्याविरोधात आपण उभे राहिलो आहोत’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीवर तोफ डागली.
शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…
‘आताशी सुरुवात झाली आहे. एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं कोणाला वाटत असेल, तर वणवा पेटवायला एक ठिणकी कारणीभूत असते आणि ती ठिणगी आज पडलेली आहे. पैशांचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावर आलं. सर्वांनी विनोद तावडेंचा तो व्हिडिओही बघितला. योजनांचा पडणारा पाऊस पाहिला. थोडक्यात या सरकारने काय केलं आहे, की योजनांचा ऍनेस्थेशिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं.’

‘मह्त्तावाचा मुद्दा एक नाहीये, असे अनेक मुद्दे आहेत. त्यापैकी एक ईव्हीएमचा मुद्दा आहे आणि म्हणूनच मी उल्लेख केला, की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे येतात. याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे’, अशा म्हणत उद्धव ठाकरेंनी EVM घोटाळा मुद्दावर भाष्य केलं.

Baba Adhav : बाबा आढावांनी उपोषण सोडलं; आता सत्तामेव जयते सुरू…उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

‘आपण RTI च्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो. अगदी सुरुवातीला एक-दोन वेळा मी बॅलेट पेपरवर मतदान केलं आहे. लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जातं हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतला आहे. कोणी म्हणतं तुम्हाला तिकडे ती रिसीट दिसत नाही का? रिसीट दिसते बरोबर आहे, पण ती रिसीट दिसल्यानंतर पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजली का जात नाही? व्हीव्हीपॅटवर जी निशाणी आहे किंवा ज्या रिसीट येतात त्यासुद्धी तुम्ही मोजा, कारण माझं मी मत जे देतो ते तुम्ही मला तिकडे दाखवता, पण आतमध्ये रजिस्टर्ड कसं होतंय, ते कळत नाही, ते कळायला मला मार्ग नाही’, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

baba adhavbaba adhav broke strike with uddhav thackerayPuneuddhav thackeray in pune baba adhavuddhav thackeray latest newsउद्धव ठाकरे पुणेउद्धव ठाकरे बाबा आढावउद्धव ठाकरे बाबा आढाव पुणे बातमीउद्धव ठाकरेंच्या हस्ते बाबा आढावांनी उपोषण सोडलं
Comments (0)
Add Comment