Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री करा, त्यांना दांडगा अनुभव आहे, त्यांच्यामुळेच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, असं म्हणत त्यांच्या शिलेदाराने मुख्यमंत्रिपदासाठी दादांच्या नावाची मागणी केली आहे.
मुस्लिम लाडक्या बहिणींचा महायुतीला पाठिंबा –
अजित पवारांनी सर्वच समाजातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली होती. मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ झाला. राज्यातील मुस्लिम महिलांनी महायुतीला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल पहिला असता, महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मतदानादिवशीचं चित्र आठवलं तर, मुस्लिम महिलांच्या रांगा मोठ्या होत्या. अल्पसंख्याक समाजातील लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते वसीम बुऱ्हाण यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी
बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदेंदेखील निवडून आले असते –
माढा विधानसभा मतदारसंघात मागील सहा टर्मपासून आमदार असलेल्या बबनदादा शिंदेंनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढणार नाही, असे जाहीर केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक वसीम बुऱ्हाण यांनी टोला लगावला. बबनदादा शिंदे आणि करमाळा येथील संजयमामा शिंदे अपक्ष लढण्याऐवजी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढले असते, तर तेही कदाचित निवडून आले असते. महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणींच्या लाटेत माढा आणि करमाळा येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आले असते. बबन दादा शिंदेंनी मोठी चूक केली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते वसीम बुऱ्हाण यांनी दिली आहे.