नितीश कुमार का होऊ शकले नाहीत एकनाथ शिंदे; महाराष्ट्रातील राजकारणात कुठे कमी पडले मुख्यमंत्री

Eknath Shinde: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळून देखील राज्यात सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप भाजपला निर्णय घेता आलेला नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला स्पष्ट विजय मिळूनही मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न कायम आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमतासाठी 13 जागा कमी असल्याने मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बिहारपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण तिकडे बहुमतासाठीचे अंतर जास्त आहे. महाराष्ट्रात मात्र फक्त 13 जागा कमी असताना देखील एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची ताकद दाखवण्यास सुरुवात केली.त्यामुळे भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

सत्ता मिळवण्यासाठीचे जागांची संख्या जर भाजपने भरून काढली तर एकनाथ शिंदे यांच्याकडे काय शिल्लक राहिली? याबाबतीत नितीश कुमार हुशार आहेत. ते जागांची संख्या इतकी ठेवतात की कधी भाजप कधी लालू यादव यांना ती भरून काढता येत नाहीत. त्यामुळे कुमार यांना सत्ता उपभोगता येते. याबाबत एकनाथ शिंदे नितीश कुमार यांच्यापेक्षा मागे राहिले. तसे नसते तर देशाच्या राजकारणात नितीश कुमार यांच्या सारखे स्थान शिंदेंना देखील मिळाले असते.

288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपने 132 जागा जिंकल्या, पण बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 145 जागांपर्यंत ते स्वबळावर पोहोचू शकले नाहीत. मित्रपक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) अनुक्रमे 57 आणि 41 जागा मिळवल्या. महायुतीने 233 जागांवर विजय मिळवला असला तरी भाजपने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.
महाराष्ट्राला ५ डिसेंबर रोजी मिळणार नवे सरकार; आझाद मैदानावर PM मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी सोहळा
23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची आपापल्या पक्षांचे नेते म्हणून निवड झाली. भाजपच्या घोषणेला झालेल्या विलंबाने अस्वस्थता वाढली आहे. काहींच्या मते शिंदे यांच्या अनपेक्षित हालचालीमुळे सत्तास्थापनेचे प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे. याबाबत बोलताना भाजपच्या एका आमदाराने सांगितले की, शिंदेंनी मोक्याच्या क्षणी चौकार मारला. ज्यामुळे निर्णय घेण्यास विलंब होत आहे. पण मला वाटत नाही की शिंदे हे प्रकरण जास्त गुंतागुंतीचे करतील.

महाराष्ट्रापेक्षा बिहारची परिस्थिती वेगळी आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीनंतर भाजपच्या जागांची संख्या 80 वर पोहोचली आहे आणि तो सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तथापि 243 जागांच्या विधानसभेत बहुमतापासून 41 जागा दूर आहेत. नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) कडे 46 जागा आहेत आणि भाजपसोबत युती करून सरकार चालवले आहे.

बिहारमधील पोटनिवडणुकीनंतर राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) कडे 77 जागा आहेत, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनिस्ट) (सीपीआय(एमएल)) 11 जागा आहेत, तर काँग्रेसकडे 19 जागा आहेत. जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाकडे 4 जागा आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) कडे 131 आमदार आहेत ज्यात भाजपचे 80, JDU चे 46, HAM चे 4 आणि एक अपक्ष यांचा समावेश आहे. विरोधी महागठबंधनमध्ये 112 आमदारांचा समावेश आहे, ज्यात RJD चे 77, काँग्रेसचे 19, CPI(ML), 2 CPI, 2 CPI(M) आणि AIMIM चे 1 आमदार आहेत.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

bjp next strategy of maharashtraCM Eknath Shindeएकनाथ शिंदेएकनाथ शिंदे आणि नितीश कुमारभाजप महाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment