Sanjay Shirsat: गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम सांभाळू! संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चेला उधाण

Sanjay Shirsat: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी गेले असून, मोठा निर्णय घेण्यासाठीच ते त्यांच्या दरे गावी जातात, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी शनिवारी केले. तर शिवसेनेकडे गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम संभाळू शकतो, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र टाइम्सsanjay shirsat
sanjay shirsat

मुंबई : राज्याच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता असतानाच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी गेले असून, मोठा निर्णय घेण्यासाठीच ते त्यांच्या दरे गावी जातात, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी शनिवारी केले. तर शिवसेनेकडे गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम संभाळू शकतो, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला.‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाण्यापेक्षा त्यांच्या दरे या गावी जात असतात. मोठा निर्णय घेण्यासाठी दरेगाव त्यांचे आवडीचे ठिकाण आहे. काही विद्वान सरकारवर टीका करत आहेत. अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, सरकार वाऱ्यावर सोडलेले नाही. सोमवारी भाजपचे निरीक्षक येणार आहेत, असे समजते. शिंदे दरेगावला का गेले याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही लाचारासारखे नाटक करणारे लोक नाही. आमची नाराजी आम्ही उघडपणे जाहीर करू. लाचारीत ज्यांनी अडीच वर्ष घालवली, त्यांच्या टीकेत काही अर्थ नाही,’ अशी टीका शिरसाट यांनी यावेळी केली.
फडणवीसच मुख्यमंत्री? भाजप पक्षश्रेष्ठींकडून नावावर शिक्कामोर्तब, अखेर अनिश्चितता दूर
‘शिंदे राज्यातच राहणार, दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. उपमुख्यमंत्रिपदाबाबत शिंदे लवकरच निर्णय घेणार आहेत. गृहखाते सर्वात महत्त्वाचे आहे. राज्यात गृहखाते आम्ही सक्षमपणे सांभाळू शकतो,’ असे शिरसाट म्हणाले आहेत.

‘शिंदे गावी दरेला जातात, तिथून आल्यानंतर पक्षासाठी योग्य तो निर्णय घेतात. ईव्हीएमबाबत जे प्रश्न उपस्थित करत आहेत, तो त्यांचा पराभवानंतरचा केविलवाणा प्रयत्न आहे. शरद पवार ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करत आहेत. एकदा पावसात भिजल्याने सत्ता आली. वारंवार भिजल्याने येतेच असे नाही,’ असा टोला त्यांनी या वेळी लगाविला.
देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…
माझ्या नावाची चर्चा तथ्यहीन : मोहोळ
पुणे :
‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची समाज माध्यमांमधून होत असलेली चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे,’ असे स्पष्टीकरण पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी मराठा समाजातील व्यक्तीची निवड करणार असून त्यामुळेच मुरलीधर मोहोळ यांचे नाव पुढे येऊ शकते, अशी चर्चा समाज माध्यमांवर होती. अखेर मोहोळ यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत, या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra cmmaharashtra govt formationMaharashtra Govt Formation 2024Mumbai news todaysanjay shirsatSanjay Shirsat PCshivsena mlaएकनाथ शिंदेसंजय शिरसाट
Comments (0)
Add Comment