Congress Show Cause Notice To Bunty Shelke: बंटी शेळके यांनी तीन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत थेट प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केले. आरोपांबाबत पटोले यांनी शुक्रवारी विचारणा केली असता, ‘हा पक्षांतर्गत मुद्दा असून आमच्याकडे औषधोपचार आहेत’, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले होते. शनिवारी नोटीस जारी झाली.

विधानसभा निवडणुकीत मध्य नागपुरात बंटी शेळके यांचा पराभव झाला. तीन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत थेट प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केले. आरोपांबाबत पटोले यांनी शुक्रवारी विचारणा केली असता, ‘हा पक्षांतर्गत मुद्दा असून आमच्याकडे औषधोपचार आहेत’, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले होते. शनिवारी नोटीस जारी झाली.
प्रदेश प्रभारी रमेश चेन्नितला यांचे आदेश व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही नोटीस बजावली. आपली कृती पक्षशिस्त भंग करणारी असल्याने पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. दोन दिवसांत लेखी खुलासा सादर केल्यास निलंबित करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
असे होते आरोप
‘प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करत असल्याने त्यांना पक्षातून बडतर्फ करून त्याच संघटनेत पाठवावे. गेल्या निवडणुकीत चार ४ हजार मतांनी पराभूत झालो. यानंतरही त्यांनी पॅनलमध्ये नाव पाठवले नव्हते. त्या निवडणुकीतही पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना माझे काम करू नये, अशी सूचना केली होती. या निवडणुकीत बहुतांश ब्लॉक अध्यक्षसोबत नव्हते. दोन्ही महिला अध्यक्ष माझ्या विरोधातील दिल्या. माझा विरोध करणाऱ्यांना पदाधिकारी करण्यात आले. निवडणुकीत बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते सोबत होते. इतरांची त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून दिली होती’, असे आरोप शेळके यांनी केले होते.