Sanjay Shirsat: गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम सांभाळू! संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चेला उधाण
राज्याच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता असतानाच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी गेले असून, मोठा निर्णय घेण्यासाठीच ते त्यांच्या दरे गावी जातात, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी शनिवारी केले. तर शिवसेनेकडे गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम संभाळू शकतो, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.