विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत महायुतीवर आरोप होत आहेत. अशातच धुळ्यात ईव्हीएम हटाव मागणीसाठी विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ९ डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.