व्यसनाधीनतेमुळे गाव त्रस्त,लाडक्या बहिणींनी दारूचा अड्डा केला उध्वस्त,विक्री थांबवा अन्यथा दारूचे दुकान जळणार
छत्रपती संभाजीनगर: अवैध दारू विक्री सुरू असल्यामुळे गावात व्यसनाधीनता वाढत चालली आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. यामुळे संतापलेल्या लाडक्या बहिणींनी दारू अड्ड्यावर धाड टाकली. दारू विक्रेत्याने लपवलेला साठा शोधून काढत दारूच्या बाटल्या फोडल्या. एवढेच नाही तर महिलांनी दारू विक्रेत्याला विक्री न करण्यासाठी दमही दिला.